शाहजहांपूर : वृत्तसंस्था – लॉ स्टुडेंटच्या लैंगिक शोषणा प्रकरणी शुक्रवारी स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम(SIT) ने माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मायानंद यांना अटक केली आहे. एसआयटीने चिन्मायानंद यांना अटक केल्यानंतर त्यांना मेडिकलसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स तैनात आहे.
सोमवारी विद्यार्थीनीचा 164 अंतर्गत कबुलीजबाब नोंदवण्यात आला. त्यानंतरच ती स्वामी चिन्मयानंद विरोधात रेपची केस दाखल करण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी मागणी करत होती. पीडितेने बुधवारी चिन्मयानंद यांना अटक न झाल्यास आत्मदहनाची धमकीही दिली होती.
BJP leader Swami Chinmayanand has been arrested in connection with the alleged sexual harassment of a UP law student. pic.twitter.com/6NVLU761fC
— ANI (@ANI) September 20, 2019
एसएस लॉ कॉलेजमधून एलएलएमचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थीनीने 24 ऑगस्ट रोजी फेसबुकवर एक व्हिडीओ व्हायरल करत माजी केंद्री मंत्र्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. यानंतर ती बेपत्ता झाली होती. तिच्या अपहरणाची केस दाखल झाली होती. युपी पोलिसांनी 30 ऑगस्ट रोजी राजस्थानच्या अलवारमधून पाडितेला शोधून काढलं होतं. यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी एसआयटीला तपासाचे आदेश दिले होते. सोमवारी पीडितेने 164 अंतर्गत कबुलीजबाबही दिला आहे.
‘दबावात तपास बदलणार नाही’ : SIT
एसआयटीचे प्रभारी आयजी नवीन अरोरा म्हणाले, “दोन्ही प्रकरणातील तपास वेगाने आणि योग्य दिशेने सुरु आहे. कोणाच्या म्हणण्याने किंवा मिडिया ट्रायलने तपासणीचा दृष्टीकोन बदलला जाणार नाही. जो व्हिडीओ मिळाला आहे त्याची सत्यता तपासली जात आहे. तथ्यांच्या आधारावर रिपोर्ट तयार केला जात आहे.
Visit : bahujannama.com