मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलीवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी या शनिवारी कार अपघातात गंभीर जखमी झाल्या. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर त्यांची कार एका ट्रकवर आदळली. अपघातानंतर शबाना आझमी यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अशी अफवा पसरली होती की अपघातग्रस्त कारमध्ये शबाना आझमी यांचे पती जावेद अख्तरसुद्धा होते, पण त्यांना साधे खरचटलेही नाही.
आता या प्रकरणात सत्य समोर आले आहे. जावेद अख्तर हे आपल्या दुसर्या खासगी वाहनाने प्रवास करत होते. त्यांची कार शबाना आझमी यांच्या कारच्या मागे होती. यामुळेच ते अपघातातून बचावले.
शबाना आझमी यांच्या नाकाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना प्रथम नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी शबाना आझमी यांना संध्याकाळी उशीरा डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मुंबईतील कोकीळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीला आता धोका नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
या अपघातात कारचा चालकही गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. हा अपघात खालापूर टोल नाक्याजवळ झाला. शबाना आझमी यांची कार ट्रकवर आदळल्याने त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताचे वृत्त समजताच लोकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरू केली. सोशल मीडियावर लोक प्रार्थना करत होते. बॉलीवुडचे कलाकार सुद्धा शबाना आझमी यांची विचारपूस करण्यासाठी रूग्णालयात पोहचले होते. फरहान अख्तर, अनिल कपूर, सतीश कौशिक, तब्बू आणि शंकर महादेवन यांनी रूग्णालयात जाणून शबाना आझमी यांची विचारपूस केली.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा