मालेगाव बहुजननामा ऑनलाईन – मालेगाव शहरातली दरेगाव शिवारात असलेल्या एका मुलींच्या मदरशामध्ये २ मुलींवर लैंगिक अत्याचारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन महिलांसह मदरशाच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.
पिडीत मुलींच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यामुळे तिच्या आईला मालेगावातील एका महिलेने तिला मालेगाव येथील मदरशात शिक्षणासाठी पाठविण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ५ महिन्यांपुर्वीच त्यांना मदरशात धार्मिक शिक्षणासाठी दाखल केले होते.
काय घडला प्रकार ?
घऱाच्या स्वच्छतेच्या कामासाठी मुलीला बोलवून तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. त्यानंतर पिडीत मुलीने थेट घराबाहेर पडून पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तिला नाशिकच्या बाल सुधार गृहात ठेवण्यात आले आहे
पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तात्काळ मदरशाचा मुख्य़ व्यवस्थापक आणि त्याची पत्नी तसेच एका महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबत एका मुलालाही ताब्यात घेतलं आहे. तिघांना न्यायालयाने ५ जूलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.