बहुजननामा ऑनलाइन टीम -नवी दिल्लीः वृत्तसंस्था:नियमित सेक्स(sex) केल्याने महिला किडनी स्टोनच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतात. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. अभ्यासानुसार, असे म्हटले आहे की तीन ते चार आठवड्यांपर्यंत नियमित सेक्स(sex) केल्यामुळे महिलांच्या किडनी स्टोनच्या समस्या पूर्णपणे दूर होऊ शकतात आणि स्टोन सहज शरीरातून बाहेर येऊ शकतो.
किडनी स्टोनवर उपचार करण्यासाठी बर्याचदा रुग्णांना शस्त्रक्रिया आणि शॉकवेव्ह थेरपी करावी लागते. पण आता तज्ञ म्हणतात की, सेक्स आणि ऑर्गेज्ममुळे शरीरातून जे केमिकल बाहेर पडते त्यामुळे स्टोनला बाहेर येण्यास मदत मिळते.
संशोधनात अशा 70 महिलांचा समावेश आहे ज्या किडनी स्टोनच्या समस्येशी झगडत होत्या. यापैकी 50 टक्के स्त्रियांना एका महिन्यासाठी आठवड्यातून 3-4 वेळा सेक्स करण्यास सांगितले गेले. त्याच वेळी, उर्वरित महिलांना या कालावधीत लैंगिक संबंधांपासून दूर राहण्यास सांगितले गेले.
दोन आठवड्यांनंतर असे दिसून आले की, नियमित सेक्स करणार्या 80 टक्के स्त्रियांचा किडनी स्टोनचा त्रास दूर झाला होता. त्याच वेळी, लैंगिक संबंधांपासून दूर राहिलेल्या केवळ 51 टक्के स्त्रियाच बरे झाल्या होत्या.
हा अभ्यास ऑस्ट्रियाच्या तुर्की विद्यापीठाने केला आहे. आंतरराष्ट्रीय युरोलॉजी आणि नेफ्रोलॉजी जर्नलमध्ये हे प्रकाशित केले गेले आहे. यापूर्वी काही अभ्यासांमध्ये असेही आढळले होते की, आठवड्यातून तीन ते 4 वेळा लैंगिक संबंध ठेवणार्या पुरुषांना किडनी स्टोनच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते. किडनी स्टोनच्या समस्येमुळे बर्याचदा वेदना होतात आणि किडनीमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो. वेळेत उपचार न घेतल्यास किडनी खराब होऊ शकते.