मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस( corona vaccine) लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी सर्वसामान्यांना किती पैसे मोजावे लागतील(How much will the corona vaccine cost in India?), ती लस कधी उपलब्ध होणार अशा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असणार. याबाबत ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची अॅस्ट्रेजेनिकासोबत चाचणी करणारे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले की, भारतात कोरोनाच्या लसची किंमत 500 ते 600 रुपयांच्या दरम्यान राहणार आहे.
एका मुलाखतीत पूनावाला म्हणाले की, की 2021 च्या पहिल्या तिमाहीत ऑक्सफोर्डच्या कोविड 19 लसचे सुमारे 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. या लसीसाठी सामान्य लोकांना 500 ते 600 रुपये द्यावे लागतील. भारत सरकारला ही लस स्वस्त दरात दिली जाईल. भारत आमची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले.
अमेरिकन औषध निर्माता कंपनी मोडेर्नाने नुकतेच जाहीर केले आहे की, कोविड 19 साठीची आमची लस 94.5 टक्के प्रभावी आहे. यापूर्वी अमेरिका आणि जर्मनी यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या फायझर (Pfizer) आणि बायोटिक यांनी देखील अशीच घोषणा केली होती. या दोन्ही लसींचा तिसरा टप्प्यातील चाचणी दरम्यान चांगला निकाल लागला असून नियामकाच्या मान्यतेनंतर, लोकांना लस डोस देण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू करण्याची शक्यता आहे.
मॉडर्ना आणि फायझर-बायोटेक या दोन कंपन्य़ांनी तिसर्या टप्प्यातील चाचणीदरम्यान मोठ्या प्रमाणात निकाल यशस्वी झाल्याची घोषणा केली आहे. तर सध्या किमान 10 कंपन्यांच्या लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. फायझरचा अभ्यास करणार्या स्वतंत्र पॅनेलने सांगितले की कोविड 19 रोखण्यासाठी ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे. असाच एक अभ्यास मॉडेर्नावर घेण्यात आला आणि त्यात ही लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचे आढळले. यूएस फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या (एफडीए) बेंचमार्क अंतर्गत मंजुरीसाठी 50 टक्के प्रभावी असणे आवश्यक आहे. म्हणून दोन्ही लसींना नियामक मंजुरी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
-फायझर लस : भारतात फायझर लसीचे स्टोरेज करणे ही सर्वात मोठी अडचण ठरणार आहे. फायझर लस -70 डिग्री तापमानात साठवावी लागते आणि वाहतूक करावी लागेल. याव्यतिरिक्त 5 दिवस फ्रिजमध्ये ठेवले जाऊ शकते. तसेच तीन आठवड्यांच्या आत या लसीचा दुसरा डोस घ्यावा लागेल.
– मोडर्ना लस : मॉडर्ना लस भारतासाठी योग्य म्हणता येईल. या लसीला स्टोरेज आणि वाहतुकीसाठी -20 डिग्री तपमान आवश्यक आहे. तर 30 दिवसांपर्यंत ही लस रेफ्रिजरेटर तापमानात ठेवता येऊ शकते. 12 तास ही लस घरातील तपमानावर देखील ठेवली जाऊ शकते. तर या लसीचा दुसरा डोस चार आठवड्यांच्या फरकांनी घ्यावा लागेल.