पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Serum Institute | कोरोनाचा संसर्ग (Corona virus) काही कमी झालेला नाही. अजूनही बाधितांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या विषाणूने वातावरणाशी जुळवले आहे. त्यामुळे डेल्टा (Delta) सारख्या प्रकारातील रुग्ण आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, परदेशात कोविशील्ड लस घेतलेल्यांना थेट प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यांना तेथे काही दिवस क्वारंटाईन (Quarantine) व्हावं लागत आहे. त्यामुळे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी एक ट्विट करत मोठी घोषणा केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Dear students travelling abroad, as a few countries are yet to approve COVISHIELD as an acceptable vaccine for travel without quarantine, you may have to incur some costs. I have set aside Rs.10 crores for this, apply below for financial support if needed. https://t.co/CbD6IsdKol
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) August 5, 2021
कोविशील्ड (Covishield) लस घेऊन परदेशात अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनिवार्य क्वारंटाईनसाठी सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute)10 कोटीची तरतूद केली असल्याचे म्हंटले आहे. अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की, प्रिय विद्यार्थ्यांनो, काही देशांमध्ये कोविशील्डची (Covishield) लस घेतलेल्यांना अद्याप थेट प्रवेश मिळत नाही आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी क्वारंटाईन अनिवार्य आहे. या परिस्थितीत तुम्हाला काही खर्च येण्याची शक्यता आहे. यासाठी मी 10 कोटींचा निधी ठेवला आहे. तुम्हाला गरज असल्यास कृपया अर्ज करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ब्रिटननं भारताचा समावेश रेड लिस्टमध्ये (Red list) केला. मात्र त्यानंतर आता भारताला 8 ऑगस्टपासून अँबर लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये गेलेल्या भारतीयांना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागत. रेड लिस्ट मध्ये असताना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन अनिवार्य होतं. मात्र, आता अँबर लिस्टमध्ये आल्याने घरी किंवा अन्य ठिकाणी क्वारंटाईन (Quarantine) राहण्याची मुभा आहे.
Web Title :- Serum Institute | adar poonawalla tweets rs 10 crore overseas for covishield vaccine students quarantine in britain
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Governor Bhagat Singh Koshyari | ‘दुनिया में सबसे जादा ‘मीडिया’ से डर लगता है’