अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला (rashmi shukla) आणि अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. (amravati sp dr haribalaji N.) यांच्यावर अमरावती पोलीस आयुक्तालयात (amravati police) कार्यरत असलेल्या वरीष्ठ लघुलेखकाने (senior shorthand writer filed complaint against rashmi shukla and amravati sp) गंभीर आरोप केले आहेत.
पदाचा दुरुपयोग करून खोटी प्राथमिक चौकशी बसविणे, चौकशी अधिकाऱ्याविरुद्ध दबाव टाकणे, खासगी आयुष्यात गोपनीयतेचा भंग करण्यासह इतरही गंभीर स्वरूपाचे काम रश्मी शुक्ला आणि पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. (Superintendent of Police Dr. Haribalaji n.) यांनी केल्याची तक्रार कर्मचा-याने गाडगेनगर पोलिस ठाण्या(Gadgenegar Police Thane) त केली आहे. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्याने केली आहे.
देवानंद भोजे (Devananda Bhoje) असे आरोप केलेल्या लघुलेखकाचे आहे. भोजे यांनी 18 जून रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात 18 पानांची तक्रार दिली आहे. रश्मी शुक्ला आणि डॉ. हरीबालाजी यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील लघुलेखक व टंकलेखक जगदीश देशमुख, पोलिस शिपाई रूपेश पाटील, किशोर शेंडे यांच्यासह अन्य पाच, असे एकूण 11 जण या कटात सहभागी होते, असा आरोप भोजे यांनी केला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी गोपनीयतेचा भंग केला, इंडियन टेलिग्राफ कायद्याचे उल्लंघन करणे, तसेच स्वत:ची व कुटुंबाची बदनामी केली, नोकरीतून काढून टाकण्याची धमकी दिली, फोन टॅपिंग, शारीरिक व मानसिक छळ करण्याचा आरोप भोजे यांनी केला. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
web title: Serious allegations against a Superintendent of Police including Rashmi Shukla; Complaint to police, demand for action
Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला गुन्हे शाखेकडून अटक; आज दुपारी कोर्टात हजर करणार
diesel Petrol price hike | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर
Pune News | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल करणार्यास घेतले पुण्यातून ताब्यात