मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- या वर्षी मुंबईत जोरदार पाऊस कोसळला. दरवर्षी मुंबईत सप्टेंबरपर्यंत जेवढा पाऊस पडतो ती सरासरी यंदाच्या पावसाने आताच ओलांडली आहे. 10 सप्टेंबरपर्यंत जेवढा पाऊस झाला आहे तो गेल्या 25 वर्षातील सर्वाधिक पाऊस आहे. यंदाच्या पावसाने नवा विक्रम रचला आहे. 10 सप्टेंबरपर्यंत तब्बल 791.2 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. सप्टेंबरअखेर आणखी पाऊस पडणार असल्याने ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरमधील सर्वाधिक पावसाचा विक्रम 2016 मध्ये नोंदवण्यात आला होता. 2016 मध्ये 756 मिमी पाऊस नोंदवला आहे. हा गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक पाऊस होता. हा विक्रम आता सोमवारी पडलेल्या पडलेल्या पावसाने मोडला. हा आतापर्यंत तिसरा सर्वाधिक पाऊस आहे. 1954 मध्ये 920 मिमी पडलेला पाऊस हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस होता. 1994 मध्ये सप्टेंबरमधील 904.6 मिमी हा दुसरा सर्वाधिक पाऊस होता.
सोमवारी झालेला पाऊस केवळ 10 दिवसांचीच आकडेवारी आहे. 4 सप्टेंबर रोजी 118 मिमी, 5 सप्टेंबर रोजी 242 मिमी आणि 8 सप्टेंबर रोजी 119 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे ही आकडेवारी वाढली. सोमवारी गोरेगाव, अंधेरी, पवई या भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते.