वर्धा : बहुजननामा ऑनलाइन – वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्यध्यापकाने शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक सतीश बजाईत याच्याविरुद्ध सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी तक्रारीनंतर उघडकीस झाली.
ही घटना भोसा येथे घडली. हा प्रकार पिडीतांनी आईला सांगितला असता पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन टँकर दाखल केली त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. जि.प.च्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार तर अकरा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले होते. आरोपीकडून हा घृणास्पद प्रकार सुमारे तीन महिन्यांपासून सुरू होता असे तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. एका प्रकरणात कलम ३७६ (अ), (ब) पॉस्को कलम ६ अंतर्गत तर दुसऱ्या प्रकरणात कलम ३५४ (अ) आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगणघाट येथील महिला अत्याचाराची घटना ताजी असतांना ही धक्कादायक घटना समोर आल्याने लोक संताप व्यक्त करत आहेत. मागील तीन महिन्यापासून शिक्षकाचा हा मनमर्जी प्रकार सुरू होता. आरोपी शिक्षक सतीश केशव बजाईत याने आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार तर अकरा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलींनी घरच्यांना सांगितल्यावर त्यावरून पडदा उठला, असे पोलिसांनी सांगितले.