चहा विका, देश विकू नका : छगन भुजबळ

February 4, 2019

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा समारोप वडगाव बुद्रुक येथे विराट जाहीरसभा झाली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ बोलत होते. देशाची लूट करुन लोक पळून जात आहेत. देशाच्या चौकीदार तुझ्या या कामावर लानत आहे. संविधान गेले तर परत एकदा देशात अंधार होईल. ही लढाई मोदी विरुद्ध संविधान अशी सुरु आहे. त्यामुळे आता परिवर्तन होण्याची गरज आहे. आणि परिवर्तन झाल्याशिवाय थांबायचे नाही असेही आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले.

तुम्ही चहा विका किंवा अन्य काही विका परंतु आमचा देश विकू नका. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी समाचार घेतला. आज अर्थ तज्ज्ञ नाही तर इतिहास तज्ज्ञ रिझर्व्ह बॅंकेचा व्यवहार सांभाळणार आहेत आणि हे आता इतिहास सांगणार आहेत. असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

ज्यांनी कधी खेळण्यातील विमान बनवले नाही त्याला विमान बनवण्याचे साडेचाळीस हजार कोटीचे काम दिले. असे सांगतानाच राफेलवर सुरु असलेल्या मुद्दयाला हात घालताना सरकारवर जोरदार टीका केली. २०१४ मध्ये फक्त विकास विकास सुरु होते आणि आता राम मंदिराचा मुद्दा घेत आहेत. यांना मंदीर नाही सरकार बनवायचं आहे, या देशात सुशिक्षित लोक किती मुर्ख आहेत हे दाखवून द्यायचे आहे.  असा आरोपही भुजबळ यांनी केला.

घरी जायची वेळ आली आणि ओबीसी समाजाला अनुदान देण्याची घोषणा केली जात आहे. ओबीसी समाजाच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचे पैसे अद्याप दिलेले नाही. या लोकांच्या भुलथापांना बळी पडू नका. यांच्यापासून सावध रहा असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले.