नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू – काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे शनिवारी सकाळपासूनच अतिरेकी आणि सुरक्षा दलातील चकमकी सुरू आहेत. सुरक्षा दलाने जैश – ए – मोहम्मदचा एक शीर्ष कमांडर, कारी यासीर आणि अन्य दोन दहशतवाद्यांना घेरले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, करी यासिर जैशसाठी फिदाईन पथक तयार करण्याचे काम करतो. सुरक्षा दल बर्याच दिवसांपासून याच्या शोधात होते.
दुसरीकडे, सुरक्षा दलांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. बांदीपुरा येथून सुरक्षा दलांनी 7 दहशतवाद्यांना अटकही केली आहे. शुक्रवार (24 जानेवारी) रोजी कारीर यासिरचा साथीदार अबू सैफुल्ला उर्फ अबू कासिम सुरक्षा दलांच्या चकमकीत ठार झाला.दक्षिण काश्मीरमध्ये चकमकीत सुरक्षा दलांनी कासिमला ठार केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासिम दक्षिण काश्मीरमधील त्राल आणि ख्रेव भागात एका वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारला गेलेला आतंकवादी ३७० कलम हटवल्यानंतर झालेल्या हत्यांमध्ये सामील होता.असे म्हटले जात आहे की एसपीओला धमकावलेली पोस्टर्स लावण्यात त्याचादेखील सहभाग होता, तर स्थानिक नसलेल्या मजुरांना खोरे सोडण्यास सांगितले होते.