बहुजननामा ऑनलाईन
भारताचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी (ms dhoni) आयपीएल 2020 साठी युएईमध्ये आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आली नाही. 7 पैकी त्यांनी केवळ 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळं काही दिवसांपूर्वी महेंद्र सिंह धोनी (ms dhoni )ला सोशल मीडियावरून धमकी देण्यात आली होती. यात त्याची मुलगी झिवा हिचा उल्लेख होता. त्यामुळं धोनीच्या रांची येथील निवास स्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याची पत्नी साक्षी आणि 5 वर्षांची झिवा घरात आहेत.
https://www.instagram.com/p/
काही दिवसांपूर्वी सीएसकेनं किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्धचा सामना गमावल्यानंतर एका युजरनं धमकी देणारा मेसेज पोस्ट केला होता. त्याच्या या धमकीचा इतरांनी चांगलाच समाचार घेतला होता. या पार्श्वभूमीवर धोनीच्या रांचीतील घरा बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनही झाला पराभव
चेन्नई सुपर किंग्सच्या निराशाजनक कामगिरीवर सर्वच नाराज आहेत. आयपीएल 2020 मध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात सीएसकेला 37 धावांनी पराभव पत्करावा लागला. 3 वेळ आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या सीएसकेचा हा 7 सामन्यांमधील 5 वा पराभव होता. त्यामुळं आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांच्यावर प्लेऑफच्या शर्यतीतून माघारी जाण्याची नामुष्की ओढवली आहे