बहुजननामा ऑनलाइन टीम – भविष्यात ते लोक सुद्धा बरे होऊ शकतात ज्यांना लकव्याचा अटॅक आला होता. जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी नुकतेच एका लकवाग्रस्त उंदराला पुन्हा चालण्या-फिरण्याच्या लायक बनवले. यासाठी त्यांनी उंदराच्या मेंदूत एक डिझायनर प्रोटीन टाकून न्यूरल लिंकला जोडले. न्यूरल लिंक मेंदूतील तो धागा असतो ज्याद्वारे मेंदूचे संपूर्ण जाळे विनलेले असते. मेडिकल सायन्समध्ये हा मोठी संधी मानली जात आहे.
उंदराच्या स्पायनल कॉर्ड म्हणजे मानेच्या पाठीमागील हाडात दुखापत झाल्याने लकवा मारला होता. ज्यामुळे तो चालू शकत नव्हता. जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी त्याच्या मेंदूत एक डिझायनर प्रोटीन टाकून ही समस्या दूर केली. आता तो चालतो तसेच धावतो सुद्धा.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्पाइनल कॉर्डमध्ये दुखापत होणे सध्या सामान्य बाब झाली आहे. माणसासोबत असे अनेकदा होते. खेळताना किंवा अॅक्सीडेंटमध्ये दुखापत होते, ज्यामुळे शरीराचा एखादा भाग किंवा अवयव लकवाग्रस्त होतो.
लकव्याची समस्या कुणाला होते
आपल्या नर्व्हस सिस्टम म्हणजे मज्जातंतूमध्ये छोटे-छोटे न्यूरॉन्स असतात. जे एकमेकांना इलेक्ट्रोकेमिकल फॉर्ममध्ये संदेश पाठवतात. जेव्हा दोन न्यूरॉन्समध्ये संबंध तुटतो तेव्हा त्यास न्यूरल लिंक खराब होणे म्हणतात. म्हणजे शरीराच्या एका भागात मेंदूतून कोणत्याही प्रकारचा संदेश जात नाही, तेव्हा शरीराचा तो भाग ढीला पडतो.
जर शरीराच्या एखाद्या लकवाग्रस्त भागाला पुन्हा कार्यरत करायचे आहे किंवा ठिक करायचे आहे तर आवश्यक आहे की मांसपेशींपर्यंत मेंदूचा संदेश पोहचला पाहिजे. हे संदेश पाठवण्यासाठी जर्मनीच्या बोशम येथील रूहर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी उंदराच्या मेंदूच्या भागाला डिजायनर प्रोटीनने सक्रिय केले. शास्त्रज्ञांच्या या टीमचे प्रमुख डायटमार फिशर यांनी सांगितले की, आम्ही ज्या डिझायनर प्रोटीनचा उपयोग केला आहे, ते शरीरात सुद्धा तयार होते, आपण ते बाहेर सुद्धा बनवू शकतो.
डायटमार यांनी सांगितले की, आपण डिझायनर प्रोटीनच्या मदतीने शरीराच्या कोणत्याही भागाला संबंधित न्यूरल लिंक्सला पुन्हा जोडू शकतो. मेंदूच्या संबंधित परिसरातला पुन्हा सक्रिय करू शकतो. या कारणामुळे उंदीर आता चालत आहे. आम्ही त्याच्या मेंदूत डिझायनर प्रोटीन इंजेक्ट केले. त्याच्या दोन-तीन आठवड्यानंतर तो स्वताहून चालायला लागला. तर, उपचारापूर्वी तो केवळ झोपून होता.
आता डायटमार फिशर यांची टीम उपचाराची ही पद्धत आणखी चांगली बनवण्यासाठी रिसर्च करत आहे. आता मोठ्या सस्तन प्राण्यांवर याची चाचणी केली जाईल. जर यांच्यावर ही चाचणी यशस्वी ठरली तर भविष्यात या ट्रीटमेंटच्या आधारे माणसाचा लकवा सुद्धा बरा करता येईल.
डायटमार म्हणतात, मनुष्याला ठिक करण्यापूर्वी खुप क्लीनिकल ट्रायल्स आणि चाचण्यांची आवश्यकता आहे. परंतु, यासाठी अनेक वर्ष लागू शकतात. कारण अजूनपर्यंत न्यूरल लिंक्सला जोडून लकवा बरा करण्याची पद्धत कुणीही शोधून काढली नव्हती. ही एकदम नवी आहे. जर यामध्ये आमच्या टीमला यश मिळाले तर मानवजातीच्या इतिहासात मोठा बदल होईल.