नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील घिरोर येथून खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीची छेड काढणाऱ्यांना विरोध करणे एका भावाला चांगलेच महागात पडले आहे. इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला तिच्याच घरात घुसून तिला फासाला लटकवण्यात आले.ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. फाशी देताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान, पोलिसही याला ऑनर किलशी जोडत असल्याचे समजत आहे.
विद्यार्थिनीचा शाळेत विनयभंग :
मृत मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी त्यांची मुलगी खेड्याजवळील शाळेत गेली होती. जेथे शाळेतील काही मुलांनी तिची छेड काढली. घरी आल्यावर पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबियांना संगितलं. तिच्या भावाला या संदर्भात माहिती मिळताच त्याने आरोपीला मारहाण केली. त्यावेळी ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून ते प्रकरण मिटवले होते.त्यानंतर गुरुवारी सकाळी कारमधून आलेले चार तरुण त्यांच्या घरात घुसले, त्यावेळी मुलगी एकटी घरात होती. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तीला फासावर लटकविले. यादरम्यान गोंधळ ऐकून गावकरी तेथे आले. विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी तातडीने आरोपीला अटक करण्याची मागणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने दाखल झाली. विद्यार्थिनीला फासावरून उतरविण्यात आले असून तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर या घटनेची माहिती ग्रामस्थांकडून घेण्यात आली. मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी काही युवकांची नावे नोंदविली आहेत. नामांकित तरुणांपैकी मुख्य आरोपींसह दोन तरुणांना काही तासांनंतर पोलिसांनी अटक केली. मुलीच्या कुटूंबानी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.
Visit : bahujannama.com