मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या दीड वर्षांपासून शाळेला टाळे लागलं आहे. यामुळे प्रत्यक्ष शिक्षणाऐवजी ऑनलाईन शिक्षण घेण्यास अधिक महत्व प्राप्त झालं आहे. त्यातच आता शालेय फी (School fees) बाबत अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच लोकांकडे कोरोनामुळे असलेली आर्थिक अडचण. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) एक (School Fee) महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या (Department of School Education) 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने ही घोषणा केली आहे. याबाबत राज्य सरकार (State Government) लवकरच अध्यादेश काढणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पालकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आताच्या अभूतपूर्व परिस्थितीत पालकांकडे फीसाठी तगादा लावण्यापेक्षा शाळेनी फी भरण्याचं स्ट्रक्चरच असं केलं पाहिजे की, जेणेकरुन एकही विद्यार्थी शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. शाळा ऑनलाईन असल्याने किमान 15 टक्क्याने फीमध्ये कपात केली गेली पाहिजे. असं सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कोर्टाने सुचवलं होतं. यावरून राज्य सरकारने (State Government) निर्णय घेतला आहे.
Web Title : School Fee | 15 percent cut in school fees cabinet meeting approves
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी