सोनीपत : वृत्तसंस्था – हरियाणाच्या सोनीपत येथील गन्नोरमध्ये एका दलित युवकाला अर्धनग्न करून बेदम मारहाण करत त्याला गाण्यावर नृत्य करण्यास भाग पाडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
ही घटना एका महिन्यापुर्वी घडलेली असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फरार झालेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत युवकाच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
हरियाणा के सोनीपत में दलित युवक ने पशुओं को पानी पिलाने से इंकार किया तो दबंगों ने अर्घनग्न करके पीटा।वीडियो भी बनाया। @mlkhattar pic.twitter.com/fRleyRSzcW
— Vinod Kapri (@vinodkapri) June 25, 2019
संबंधित तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित १७ वर्षांचा तरुण हा एका फॅक्टरीत काम करतो. गावातील जितेंद्र आणि मोहित नावाच्या तरुणांनी त्याला शेतामध्ये काम करण्याबरोबरच शेतात जनावरांची देखभाल करण्यास सांगितले. परंतु तो फॅक्टरीत काम करत असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्याने शेतात काम करण्याला नकार दिला. यानंतर जितेंद्र व मोहितने त्याला पकडून शेतात नेले आणि शेतातील एका खोलीत नेऊन त्याला अर्धनग्न केले. त्यानंतर त्याला बेदम माराण केली. यावेळी तो जीवाच्या आकांताने ओऱडत होता. त्याला त्याच अवस्थेत नाचायला भाग पाडले.
पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
इतर बातम्या-
हे तर प्यादे आहेत, सनातन्यांचे खरे मारेकरी बाप शोधा
मराठा एकजुटीला यश, मराठा आरक्षण न्यायालयात टिकलं
महाराष्ट्रात ‘अब तक’ ? % ‘आरक्षण’, पहा कोणत्या समाजाला किती आरक्षण?