बहुजननामा ऑनलाईन टीम – आपण जर ऑनलाइन शॉपिंगवर भर देत असाल तर आपल्यासाठी एक विशेष संधी आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचा एक फेस्टिवलला १० डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या फेस्टिवलमध्ये तुम्ही बाजारापेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. एसबीआयने शॉपिंग महोत्सव आपल्या डिजिटल अॅप YONO वर सुरू करण्याची घोषणा केली आहे.
१० डिसेंबरपासून हा महोत्सव १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ५ दिवसांच्या या ऑनलाइन विक्रीत तुम्हाला वेगवेगळ्या वस्तूंवर जबरदस्त सूट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये योनो वापरकर्त्यांसाठी विविध उत्पादने आणि सेवांवर ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. दुसरीकडे तुमच्याकडे एसबीआयचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असल्यास तुम्हाला दहा टक्के वेगळे कॅशबॅक मिळेल.
दरम्यान, कॅशबॅकसाठी किमान १००० रुपयांचा व्यवहार करणे बंधनकारक आहे. त्याच वेळी, आपल्याला केवळ २५०० रुपयांपर्यंतची कॅशबॅक मिळेल. एसबीआय महोत्सवाची ही दुसरी आवृत्ती आहे. अशा परिस्थितीत आपण एसबीआयच्या या महोत्सवाचा फायदा १४ डिसेंबरपर्यंत घेऊ शकता.