नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Toll Free Number | जर तुमचे बँक खाते देशातील सर्वात मोठी बँक SBI मध्ये असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना फोनवरच सर्व बँकिंग सेवा देण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. तुमच्या बँक खात्याशी संबंधित ए टू झेड समस्या या क्रमांकावर सोडवल्या जातील.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एसबीआय कॉन्टॅक्ट सेंटर सर्व्हिस
एसबीआयने आपल्या ग्राहकांना 24×7 बँकिंग सेवा देण्यासाठी कॉन्टॅक्ट सेंटर सर्व्हिस सुरू केली आहे. यासाठी त्यांनी लक्षात ठेवण्यास सोपे दोन क्रमांक 1800 1234 आणि 1800 2100 हे सादर केले आहेत.
या नंबरवर कॉल करून, तुम्ही तुमच्या एसबीआय खात्याशी संबंधित समस्या कधीही आणि कुठेही सोडवू शकता. तुम्ही या क्रमांकांवर कॉल करून या बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकता…
Call SBI Contact Centre and experience a wide range of banking services on the go.
Call us today at 1800 1234.#SBI #SBIContactCentre #TollFree #PhoneBanking pic.twitter.com/S4yQPllDn3— State Bank of India (@TheOfficialSBI) October 22, 2021
फोन नंबरवर मिळतील या सेवा
या फोन नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासणे, शेवटचे 5 व्यवहार,
एटीएम कार्ड ब्लॉक करणे यासारख्या गोष्टी करू शकता.
याशिवाय, एटीएम कार्ड ब्लॉक केल्यानंतर, तुम्ही नवीन कार्डसाठी विनंती देखील नोंदवू शकता. (SBI Toll Free Number)
एवढेच नाही तर या क्रमांकांवर तुम्ही एटीएम कार्डचे डिस्पॅच स्टेटस, तसेच चेकबुकचे डिस्पॅच स्टेटस जाणून घेऊ शकता.
याशिवाय टीडीएसशी संबंधित माहिती आणि व्याज तपशीलही या क्रमांकांवर मिळू शकतात.
या सेवांव्यतिरिक्त, या नंबरवर कॉल करून, तुम्ही बँकिंगशी संबंधित जवळपास सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता.
सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे, तर जगातील टॉप – 50 बँकांमध्ये तिचा समावेश आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
स्वातंत्र्यापूर्वी ती एम्पीरियल बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखली जात असे. भारताच्या बँकिंग क्षेत्रात एसबीआयचा हिस्सा 23% पेक्षा जास्त आहे. तिच्या देशभरात 22 हजारांहून अधिक शाखा आहेत, तर 62,000 हून अधिक एटीएम मशीनचे नेटवर्क आहे.