नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Term Deposit Scheme | बँक फिक्स्ड डिपॉझिट किंवा टर्म डिपॉझिट हा पारंपरिक गुंतवणूक पर्याय आहे. सुरक्षित आणि ठराविक उत्पन्न मिळवण्यासाठी बँक एफडी (Bank FDs) हा एक चांगला मार्ग आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI) ने आपली एफडी आकर्षक करण्यासाठी मंगळवारी व्याजदरात वाढ केली आहे. बँक एफडीमध्ये, तुम्ही एकरकमी जमा करू शकता आणि तुमच्या मूळ रकमेवर ठराविक व्याज मिळवू शकता. (SBI Term Deposit Scheme)
याशिवाय, जर तुम्ही 5 वर्षांसाठी एफडी केली असेल तर तुम्ही कर सवलत देखील घेऊ शकता. SBI त्यांच्या 5 वर्षांच्या एफडीवर 5.50 टक्के वार्षिक व्याज सामान्य ग्राहकांना आणि 6.30 टक्के ज्येष्ठ नागरिकांना देत आहे.
10 लाख ठेवीवर 3.66 लाख व्याज
FD Calculator नुसार, तुम्ही एसबीआयमध्ये 5 वर्षांसाठी 10 लाख रुपयांची एकरकमी ठेव ठेवल्यास, मॅच्युरिटीवर तुम्हाला 13,14,067 रुपये मिळतील. यामध्ये 3.14 लाख रुपयांचे व्याज मिळेल. दुसरीकडे, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यास, 10 लाख रुपयांच्या एफडीवर, तुम्हाला मॅच्युरिटीवर 13,66,900 रुपये मिळतील. यामध्ये व्याजातून 3,66,900 रुपये उत्पन्न मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय SBI Wecare
एसबीआय ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय वुईकेयर (SBI Wecare) योजना रिटेल बँक फिक्स्ड डिपॉझिट/टर्म डिपॉझिट मुदत ठेवमध्ये चालवत आहे. या योजनेत, 0.50 टक्के व्यतिरिक्त, 0.30 टक्के म्हणजेच 0.80 टक्के अधिक व्याज सर्व ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या एफडीवर दिले जात आहे. बँकेने ही योजना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. (SBI Term Deposit Scheme)
बँक FD चे फायदे
बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट/टर्म डिपॉझिट योजना सुरक्षित मानल्या जातात. जोखीम न घेणार्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. 5 वर्षांच्या कर बचत एफडीवर कलम 80 सी मध्ये कर सूट उपलब्ध आहे. मात्र, FD मधून मिळणारे व्याज करपात्र आहे.
Web Title :- SBI Term Deposit Scheme | sbi fd scheme check interest income on 10 lakh lumpsum 5 years deposit after rate hike and tax deduction as well
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Narayan Rane | ‘दुसरा कोणी असता तर पदावर बसला नसता’; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा