बहुजननामा ऑनलाईन टीम – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे. एसबीआयने ग्राहकांना हा इशारा दिला आहे की, इंटरनेटवर कस्टमर केअर नंबर मिळविणे कदाचित तुम्हाला महाग पडू शकते. बँकेने ट्वीटद्वारे ग्राहकांना सांगितले आहे की, त्यांनी बनावट ग्राहक सेवा क्रमांकाच्या प्रभावाखाली येऊ नये अन्यथा ते बनावटीचे शिकार होऊ शकतात. एसबीआयची अधिकृत वेबसाइट bank.sbi कडून नेहमी संपर्क व शाखांची माहिती घ्या असेही बँकेने म्हटले आहे.
काय करू नये
>> एसबीआयने ट्विट करुन म्हटले आहे की ग्राहकांनी कधीही इंटरनेटद्वारे सापडलेल्या बँक / शाखा क्रमांकांवर कॉल करु नये.
>> आपली वैयक्तिक माहिती कोणाबरोबर शेअर करू नका.
>> तसेच, बँक खाते क्रमांक, कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही, ओटीपी आणि पिन यासारखी आपली बँक तपशील कोणालाही सांगू नका.
इंदिरा गांधींविषयीचे खरे सत्य जे तुम्हाला माहित नाही काय करावे ?
>> बँकेने सांगितले की केवळ https://bank.sbi वर उपलब्ध ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधा.
>> शाखांचे तपशील फक्त https://bank.sbi/web/home/locator/branch वर मिळवा.
>> एसबीआयशी संपर्क साधण्यासाठी फक्त अधिकृत पद्धती वापरा.
ग्राहक सेवा क्रमांक
एसबीआयनेही ट्विटमध्ये आपला ग्राहक सेवा क्रमांक जाहीर केला आहे. कोणत्याही मदतीसाठी आपण एसबीआयच्या 24 × 7 टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080-26599990 वर कॉल करू शकता.
तपशील आपल्याकडे मर्यादित ठेवा
यापूर्वी बँकेने ग्राहकांना त्यांच्या कार्डची माहिती स्वत :पुरतीच मर्यादित ठेवावी असा इशारा दिला होता. हे इतरांसह शेअर करू नका. आपल्याला फक्त आपल्या बँक तपशिलांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे जसे की, पासवर्ड (Password), पिन (PIN), ओटीपी (OTP), सीवीवी (CVV), यूपीआई-पिन (UPI-PIN) इत्यादी माहिती फक्त स्वतःला असावी इतर कोणालाही नाही.
त्वरित बँकेला कळवा
एसबीआयने आपल्या दुसर्या ट्वीटमध्ये ग्राहकांना सांगितले की, जर तुमच्या बँक खात्यात फसवणूक होत असेल तर ताबडतोब तुमच्या बँकेत कळवा. RBIKehtaHai कडून द्रुत माहिती मिळाल्यावर आम्ही आमच्या वतीने त्वरित कारवाई करू शकतो. आपल्या खात्यातील कोणत्याही अनधिकृत कृतीसाठी सतर्क रहा आणि त्वरित आम्हाला कळवा.
Don't get misled by fake customer care numbers & avoid falling prey to fraudsters. Ensure that you always procure contact and branch information from the official #SBI website – https://t.co/1RhV1IpQyW#SBI #StateBankOfIndia #SecurityTips #KnowledgeIsPower #CustomerSafety pic.twitter.com/MVOZRS2NzY
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 20, 2019
Visit : bahujannama.com