नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशल कॅडर ऑफिसर (एससीओ) च्या पदांवर नेमणुका केल्या आहेत. त्या अंतर्गत एकूण ७७ जागांसाठी नेमणुका घेण्यात येतील. या पदांवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र उमेदवार या ऑफिशिअल वेबसाइट sbi.co.in वर अर्ज करू शकतात.
या पदांवर भरतीसाठी नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अधिसूचना आणि या वर्षाच्या जुलै महिन्यात SCO भरतीसाठी देण्यात आलेल्या जुन्या अधिसूचनांबाबत कनफ्यूज होऊ नये असा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे. तसेच या पदांवर भरती नियमित व कंत्राटी पद्धतीने होतील. मॅनेजर ऐनालिस्ट आणि डेप्युटी मॅनेजर यासारख्या काही पदांसाठी नियमित नेमणूक तर कंत्राटी पद्धतीने कार्यकारी व वरिष्ठ कार्यकारी सारख्या इतर पदांवर भरती केली जाईल.
ही फी असणार
अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील उमेदवारांना ७५० रुपये एप्लिकेशन फी भरावी लागणार. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग व्यक्तींना कोणतीही फी लागणार नाही.
अशी होणार निवड
या पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. बँक पॅनेलद्वारे गुणवत्तेच्या आधारे अर्जदारांची निवड केली जाईल. केवळ शॉर्टलिस्टेड उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. अंतिम गुणवत्ता यादी उमेदवारांच्या मुलाखतीच्या आधारे तयार केली जाईल.
Visit : bahujannama.com