बहुजननामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँकेने (SBI) गृह कर्जावरील व्याज दर सवलत रद्द केली आहे. आता 1 एप्रिलपासून बँकेच्या गृह कर्जाचे दर 0.25 टक्क्यांनी वाढले आहेत. याद्वारे, अशी अपेक्षा आहे की येत्या काही दिवसांत उर्वरित बँकादेखील त्यांचे व्याज दर वाढवू शकतात. एसबीआयने 1 एप्रिलपासून गृह कर्जाचे व्याज दर बदलले आहेत. आता हे दर 6.95 टक्क्यांपासून सुरू आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने काही महिन्यांपूर्वी सिबिल स्कोअरवर आधारित गृह कर्जात सुमारे 0.1 टक्के सवलत जाहीर केली होती. यामुळे एसबीआयचे गृह कर्ज कमीतकमी 6.70 टक्के व्याजदरावर घसरले.
मात्र, आता हे दर 6.95 टक्क्यांपासून सुरू आहेत. म्हणजेच गृह कर्जाचे दर 25 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत. याद्वारे, अशी अपेक्षा आहे की येत्या काही दिवसांत उर्वरित बँकादेखील त्यांचे व्याज दर वाढवू शकतात.
पूर्वी देण्यात आल्या सवलती
बँकेने म्हटले होते की, हा सवलत दर फक्त 31 मार्च 2021 पर्यंत राहील. याशिवाय बँकेने 31 मार्चपर्यंत 100% प्रक्रिया शुल्क माफ करण्याचे जाहीर केले आहे, म्हणजेच मार्च अखेर गृह कर्ज घेणाऱ्यांना कोणतेही प्रक्रिया शुल्क भरण्याची गरज नव्हती. तसेच, बँकेने म्हटले की, ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असेल त्यांनाच हा सवलत दर देण्यात येईल. बँकेने आपली व्याज दर सवलत सिबिल स्कोअरशी जोडली. आता या सवलती संपविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बँक आपले कर्ज मंजूर करेल की नाही हे ठरविण्यात सिबिल स्कोअरची मोठी भूमिका आहे. सिबिल स्कोअर 3 अंकाचा असतो. हे ग्राहकाच्या क्रेडिट हिस्ट्रीबद्दल सांगते.