1 ऑक्टोबर पासून SBI चे ‘हे’ 6 नियम बदलणार, 32 कोटी खातेदारांच्या व्यवहारावर परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपले खाते देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये असेल तर आपण ही बातमी वाचली पाहिजे. वास्तविक, १ ऑक्टोबरपासून SBIकडून काही सेवा शुल्कात बदल केले जात आहेत. या बदलांचा परिणाम देशभरातील एसबीआयच्या सर्व ३२ कोटी खातेदारांवर होईल. या बदलांनुसार, जर बँक मासिक सरासरी शिल्लक (MAB) राखत नसेल तर दंडात ८० टक्के कपात केली जाईल. याशिवाय १ ऑक्टोबरपासून अंमलात आणल्या जाणार्या काही इतर बदल बँकेकडून करण्यात येत आहेत. NEFT आणि RTGS व्यवहार ऑनलाईन व्यवहार करणार्यांनाही स्वस्त वाटतील.
अलिकडील काळात SBI आणि इतर काही बँकांच्या नियमांमध्ये वेळावेळी बदल होत आहेत. RBIच्या नियमानूसार रेपो रेट लागू करण्यासंदर्भात देखील काही बँकांनी वेगळीच भूमिका घेतली होती. RBIच्या आदेशानुसार SBIनं रेपो रेट लागू देखील केले. त्यानंतर काही सुविधा वापस घेण्यात आल्या. पुन्हा SBIनं RBIच्या नियमांचं पालन करत रेपो रेट नूसार गृह, वाहन आणि इतर कर्जांवरील व्याजदर ठरवले.
पहिला बदल – जर तुम्ही मेट्रो सिटी किंवा शहरातील खातेधारक असाल तर क्रमश: ५,००० रुपये आणि ३,००० रुपये ठेवावा लागत होते मात्र १ ऑक्टोबर पासून या ठिकाणी ऍव्हरेज बॅलेन्स कमी होऊन तीन हजार इतका होऊ शकतो.
दुसरा बदल – या आधी शहरी भागातील खातेदाराचा बॅलेन्स ३००० रुपये ठेवणे अनिवार्य होते जर हा बॅलेन्स ७५ % पेक्षा खाली गेला तर १५ पेनल्टी आणि जी एस टी भरावा लागत असे. आता हेच ८० रुपये आणि जीएसटी आहे. यापद्धतीने ५० से ७५ % इतका कमी बॅलेन्स ठेवणाऱ्याना १२ रुपये आणि जीएसटी भरावा लागणार आहे.
तिसरा बदल – आता एसबीआयमध्ये सॅलरी अकाउंट, बेसिक सेविंग्स बँक डिपॉजिट, पीएम जनधन योजना खाते एएमबी मध्ये समाविष्ट होत नाहीत. परंतु १ ऑक्टोबर पासून नो फ्रिल अकाउंट, १८ वर्षांपर्यंतचे नाबालिग, पेंशनर, सीनियर सिटीजन आणि २१ वर्षांच्या विद्यार्थ्यांचे अकाउंट एएमबीमधून बाहेर असणार आहेत.
चौथा बदल – एसबीआयच्या डिजिटल मोडने आरटीजीएस आणि एनईएफटीच्या माध्यमातुन ट्रांजेक्शन १ जुलै पासून मोफत करता येणार आहे. परंतु आता १ ऑक्टोबर पासून ब्रांचमधून NEFT/ RTGS करण्यासाठी पहिल्यापेक्षा कमी चार्ज लागणार आहे. आता ब्रांच मधून १० हजार पर्यंतची एनईएफटी केल्यावर २ रुपये, एक लाख ते दोन लाखांपर्यंतच्या एनईएफटीवर १२ रुपये, दोन लाखांपेक्षा जास्तीच्या एनईएफटीवर २० रुपायांव्यतिरिक्त जीएसटी द्यावा लागणार आहे. याप्रकारे दोन लाख ते ५ लाखांपर्यंतच्या आरटीजीएसवर २० रुपये आणि ५ लाखांपेक्षा जास्तच्या आरटीजीएसवर ४० रुपये अजून जीएसटी द्यावा लागेल.
पाचवा बदल – SBI चे एटीएम चार्ज सुद्धा १ ऑक्टोबर पासून बदलणार आहेत. ग्राहक ६ मेट्रो सिटीच्या एटीएम मधून १० फ्री ट्रांजेक्शन करू शकतात. अन्य शहरातील एटीएम वरून १२ फ्री ट्रांजेक्शन करता येणार आहेत.
सहावा नियम – सेविंग्स अकाउंट धारकांसाठी एका वर्षासाठी पहिले १० चेक फ्री असतील. त्यानंतर १० चेकवाल्या चेकबुकसाठी ४० रुपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. २५ चेक असलेल्या चेकबुकसाठी ७५ रुपये आणि जीएसटी द्यावा लागेल. सीनियर सिटीजन आणि सॅलरी अकाउंट वाल्यांसाठी चेक बुक फ्री आहे.
Visit : bahujannama.com
Comments are closed.