नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण आपल्या मुलांसाठी बँक खाते उघडू इच्छित असाल तर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (भारतीय स्टेट बँक) मुलांसाठी खास बँक खाती उघडते. या खात्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात किमान शिल्लक राहण्याची कोणतीही समस्या नाही. तसेच त्यात खाते उघडल्यानंतर आपल्या मुलाचा फोटो छापलेले एटीएम (डेबिट कार्ड) कार्ड मिळेल.
जाणून घ्या या खात्याबद्दल
एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ‘पहला कदम’ आणि ‘पहली उड़ान’ या योजनेंतर्गत अल्पवयीन मुलांचे खाते उघडले जाऊ शकते. यामाध्यमातून तुम्ही मुलांसाठी मोठी रक्कम देखील साठवू शकता. त्याचबरोबर मुलांना पैश्याचे महत्व देखील समजावून सांगता येते.
अशापद्धतीने छापला जातो एटीएमकार्डवर फोटो
या योजनांमध्ये बँक ५००० रुपये काढण्याची आणि त्याची खरेदी करण्याची परवानगी देते. त्याचबरोबर मुलांचा फोटो असलेले एटीएम कार्डदेखील बँक देते. मात्र हे कार्ड मुलांच्या नावे न देता त्यांच्या पालकांच्या नावे देते.
यासंदर्भातील पाच महत्वाच्या गोष्टी
योग्यता:
यामध्ये कोणत्याही अल्पवयीन मुलाला खाते खोलता येत असून आपल्या आईवडिलांच्या नावासह ते संयुक्त खाते खोलू शकतात. 10 वर्षांच्या पुढील मुलांना हे खाते खोलण्यास परवानगी असून ज्याच्या नावे हे खाते खोलण्यात आले आहे केवळ तोच याचे संचालन करू शकतो.
जास्तीतजास्त रक्कम :
यामध्ये तुम्ही जास्तीतजास्त १० लाख रुपयांपर्यंत रक्कम ठेवू शकता.
इंटरनेट बँकिंग :
या दोन योजनांच्या माध्यमातून प्रतिदिवस तुम्ही ५००० रुपये काढू शकता. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये इंटरनेट बँकिंगची सुविधा देखील मिळणार आहे.
चेक बुक सुविधा:
या योजनेमध्ये खाते उघडल्यास तुम्हाला १० चेक असणारे चेकबुक देखील मिळणार आहे.
एटीएम कम डेबिट कार्ड:
एटीएम कम डेबिट कार्डची सुविधा पहला कदम आणि पहली उड़ान खात्यात दिली जाते. मुलाचा फोटोही कार्डवर असणार आहे. हे मुलाच्या आणि पालकांच्या नावे जारी होते. या कार्डमधून पैसे काढण्याची मर्यादा ५००० रुपये आहे. मुल २००० रुपयांपर्यंत पेमेंट करू शकते किंवा या खात्यांमधून टॉप अप मिळवू शकेल. या दोन्ही खात्यांवरील व्याज (४ टक्के) बचत खात्यासारखे आहे. त्याचबरोबर यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम कार्ड, चेकबुक यांसारख्या सुविधा देखील मिळतात.
Visit : bahujannama.com