नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची सर्वात मोठी सरकारी बँक, भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देत असते. कठीण काळात ग्राहकांना आपले फिक्स्ड डिपॉझिट तोडण्याची गरज भासू नये, यासाठी एसबीआयने मल्टी ऑपशन डिपॉझिट स्कीम (एमओडीएस) सुविधा दिली आहे. यामध्ये ग्राहक आपल्या गरजेच्यावेळी 1000 रुपयांच्या पटीत पैसे काढू शकतात.
जाणून घ्या काय आहे एमओडीएस ?
एमओडीएस एक प्रकारचे टर्म डिपॉझिट आहे, जे सेव्हिंग्ज किंवा करंट अकाऊंटशी लिंक्ड असते. अशावेळी जर ग्राहकाला त्या लिंक्ड अकाऊंटमधून पैसे काढायचे असतील आणि ते पैसे खात्यात नसतील तर पैसे एमओडीने काढले जाऊ शकतात. एमओडीएसवर सुद्धा तितकेच व्याज मिळते, जे एसबीआयमध्ये एका सामान्य एफडीवर आहे. पैसे काढल्याच्या नंतर व्याज एमओडीमध्ये शिल्लक अमाऊंटवर मिळत राहते.
काय आहे स्कीमचे वैशिष्ट्य
* एमओडीएससाठी मिनिमम टर्म डिपॉझिट 10,000 रुपये आहे. नंतर यामध्ये 1,000 रुपयांच्या मल्टीपल्समध्ये आणखी पैसे डिपॉझिट करता येऊ शकतात.
* यामध्ये मॅक्झिमम अमाऊंटसाठी कोणतेही लिमिट ठरलेले नाही.
* एसबीआय एमओडीएस 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी उघडता येऊ शकते. यामध्ये प्रीमॅच्युअर चे पैसे काढण्याची सुद्धा सुविधा आहे. मात्र, यावर टीडीएस अॅप्लीकेबल आहे.
* एमओडीएसवर लोन घेणे आणि नॉमिनेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. हे एसबीआयच्या एका ब्रँचमधून दुसर्या ब्रँचमध्ये ट्रान्सफर करता येते.