नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण कार खरेदी करणार असाल तर आपल्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एक खास ऑफर सुरू केली आहे. एसबीआयच्या या ऑफरअंतर्गत तुम्हाला कार बुक केल्यावर ५ लाखांपर्यंतचे कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळेल. स्टेट बँक ऑफ इंडियाने एक ट्विट केले आहे. या ऑफर अंतर्गत जर ग्राहक एसबीआयच्या योनो अॅपवर फोर्ड इकोस्पोर्ट बुकिंग करत असेल तर त्याला ५०% कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळू शकेल. ही कॅशबॅक ५ लाख रुपयांपर्यंत असेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या ग्राहकांकडे फक्त ३१ नोव्हेंबर २०१९ पर्यंत वेळ आहे.
अशा प्रकारे करू शकता फोर्ड इकोस्पोर्टची बुकिंग
सर्वप्रथम आपल्या मोबाइल फोनमध्ये एसबीआयचा योनो अॅप इंस्टॉल करा. त्यानंतर अॅपवर आपले रजिस्ट्रेशन करा. जर आपण एसबीआयची इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर वापरकर्त्याचे नाव, पासवर्ड आणि रेफरल कोड टाका. जर आपण इंटरनेट बँकिंग वापरत नसाल तर आपल्याला एटीएम कार्डची माहिती द्यावी लागेल. आपण योनो अॅप डाउनलोड केल्यानंतरच फोर्ड इकोस्पोर्ट बुक करा.
ऑफरमध्ये काय आहे विशेष ?
१] या ऑफरमध्ये एसबीआय कार कर्जावर कोणतीही प्रोसिंग फीस घेत नाही. म्हणजेच शून्य प्रक्रिया शुल्कात ग्राहक एबीसी कारचे कर्ज घेऊ शकतात. ही ऑफर 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत आहे.
२] या व्यतिरिक्त ग्राहकांना ८,५३६ रुपयांचे विनामूल्य सामानसुद्धा मिळत आहे. ही ऑफर ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत व्हॅलिड आहे.
Visit : bahujannama.com