नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यामुळे शेकडो जण बेरोजगार झाले आहेत. पण नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकासाठी ही महत्वाची बातमी असणार आहे. त्यांना आता भारतीय स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी मिळू शकते. कारण देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने क्लेरिकल केडरमध्ये ज्युनियर असोसिएट पदांवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या स्टेट बँकेत तब्बल 5,237 पदांसाठी जम्बो भरती होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतील. ही अर्ज प्रक्रिया 17 मे, 2021 पर्यंत सुरु राहणार आहे. नोटिफिकेशननुसार उमेदवार केवळ एका राज्यासाठी अर्ज करू शकतात. ज्या राज्यासाठी अर्ज करणार आहात त्या राज्यातील स्थानिक भाषेचे तुम्हाला पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. तुम्हाला ती भाषा वाचता, लिहिता आणि बोलता यायला हवी.
पात्रता काय?
– कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी असणे अनिवार्य.
– जे विद्यार्थी आता अंतिम वर्षाला आहेत. मात्र, अजून अंतिम परीक्षा झालेली नाही, ते देखील अर्ज करू शकतात. मात्र त्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र 16 ऑगस्ट, 2021 पूर्वी मिळायला हवे.
वयोमर्यादा काय?
20 ते 28 वर्षे. उमेदवारांचा जन्म 2 एप्रिल, 1993 पूर्वी आणि 1 एप्रिल 2001 नंतरचा नसावा.
वेतनमान काय?
– 17,900 रुपये – 47,920 रुपये.
– बेसिक पे 19,900 रुपये.
अशी असेल निवड प्रक्रिया…
सर्वात आधी ऑनलाईन पूर्व परीक्षा घेतली जाईल. यात उत्तीर्ण होणारे उमेदवार ऑनलाईन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची स्थानिक भाषेची चाचणी घेण्यात येईल.
परीक्षा कशी असेल?
पूर्व परीक्षा एक तास कालावधीची असेल. यामध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक योग्यता आणि तार्किक क्षमतेशी संबंधित एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न असतील. पूर्व परीक्षा 100 गुणांची असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा होईल.
अर्ज शुल्क काय?
– सामान्य, ईडब्ल्यूएस, ओबीसी – 750 रुपये
– एससी, एसटी, दिव्यांग प्रवर्ग – नि:शुल्क
महाराष्ट्रातील प्रवर्गनिहाय रिक्त पदे –
– सर्वसाधारण – 286
– एससी – 63
– एसटी – 56
– ओबीसी – 172
– ईडब्ल्यूएस – 63
– एकूण पदे – 640
महत्वपूर्ण तारखा :
– ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 27 एप्रिल 2021
– ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत – 17 मे, 2021
– प्री एक्झाम ट्रेनिंग कॉल लेटर – 26 मे 2021
– प्रीलिम्स एक्झाम डेट – जून 2021
– मेन एक्झाम – 31 जुलै 2021