नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत मोफत इन्श्युरन्स (Free insurance) देत आहे. बँक, ही सुविधा जन धन अकाऊंट (Jan Dhan Accounts) च्या खातेधारकांना देत आहे. SBI ज्या ग्राहकांकडे रुपे (RuPay) डेबिट कार्ड आहे, त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत मोफत आकस्मिक विमा कव्हर देते. RuPay डेबिट कार्डचा वापर करणार्यांना मृत्यू विमा, खरेदी सुरक्षा कव्हर आणि इतर लाभ मिळातात. जन धन अकाऊंट (Jan Dhan Accounts) खातेधारक मोफत इन्श्युरन्सचा लाभ घेऊ शकतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
असा करा क्लेम
व्यक्तिगत दुर्घटनेनंतर आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर विमा रक्कमेनुसार भारतीय रुपयात क्लेमचे पैसे दिले जातील. न्यायालयाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारसांच्या खात्यात नॉमिनी बनू शकतो.
mumbai corona vaccination | मुंबईत कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधातून मिळणार सवलत ?
ट्रान्सफर करण्याचा सुद्धा आहे पर्याय
कोणत्याही जुन्या बचत खात्याला जनधन खाते करणे खुप सोपे आहे. सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या शाखेत जा. तिथे एक फॉर्म घेऊन भरा. नंतर आपल्या खात्यासाठी रुपे कार्डसाठी अर्ज करा. तो भरल्यानंतर बँकेत जमा करा. यानंतर तुमचे खाते जनधन खात्यात बदलले जाईल. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जनधन खात्यांवर जारी रूपे कार्डची विमा रक्कम 1 रूपये असेल. तर 28 ऑगस्ट 2018 नंतर काढलेल्या रूपे कार्डवर 2 लाखापर्यंतचे अॅक्सिडेंटल बव्हर मिळेल.
2014 मध्ये सुरू झाली होती योजना
जनधन योजना 2014 मध्ये सुरू झाली होती.
गरीब लोकांना परवडणार्या आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि जमा खाते,
क्रेडिट, विमा, पेन्शन इत्यादी सुविधा दिल्या जातात.
कुणीही व्यक्ती केवायसी कागदपत्रे देऊन ऑनलाइन जनधन खाते उघडू शकतो.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : sbi benefits of up to rs 2 lakh to jan dhan account holders check details varpat
हे देखील वाचा
Petrol Diesel Price Today | इंधन दरवाढ सुरूच; पेट्रोल 34 पैसे तर डिझेल 28 पैशांनी महागले
bollywood News | करीना कपूर खानने पुन्हा दिली GOOD NEWS, तिसर्या मुलाचा केला उल्लेख