नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपले जर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये खाते असेल आणि आपण बँक एटीएम-डेबिट कार्ड (एटीएम किंवा डेबिट कार्ड) कार्ड वापरत असाल तर आपण सावध असणे आवश्यक आहे. एसबीआय बँकेने ट्विट केले आहे की, ग्राहकांनी त्यांचे जुने चुंबकीय एटीएम-डेबिट कार्ड बदलले पाहिजेत. ग्राहकांना हे काम ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत करावे लागेल कारण ते नवीन वर्षापासून जुन्या एटीएम-डेबिट कार्डमधून पैसे काढू शकणार नाहीत. म्हणजेच, नवीन एटीएम-डेबिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे सुमारे १५ दिवस बाकी आहेत.
एसबीआयने ट्विट केले आहे की, ज्या ग्राहकांकडे मॅग्नेटिक कार्ड आहेत त्यांना त्वरित बदलावे लागेल. त्याऐवजी ग्राहकांना EVM चिप डेबिट कार्ड घ्यावे लागेल. याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.
Apply now to change your Magnetic Stripe Debit Cards to the more secure EMV Chip and PIN based SBI Debit card at your home branch by 31st December, 2019. Safeguard yourself with guaranteed authenticity, greater security for online payments and added security against fraud. pic.twitter.com/t9K3TiGTad
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 30, 2019
एटीएम-डेबिट कार्डांवर कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये आणि ते पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी एसबीआय बँक नवीन ईएमव्ही चिपसह एक कार्ड जारी करीत आहे. ही नवीन चिप एटीएम-डेबिट कार्ड आता कोणत्याही शुल्काशिवाय विनामूल्य केली जात आहेत. हे कार्ड मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. होम ब्रँच म्हणजे ज्या शाखेत तुमचे खाते आहे, तुम्हाला नवीन एटीएम-डेबिट कार्डसाठी अर्ज करावा लागेल. आपण नेटबँकिंगचा वापर केल्यास आपण एटीएम-डेबिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
Visit : bahujannama.com