नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल, तर तुम्ही अशा काही चूका करू नका, ज्या अन्य लोक करतात. जर तुम्ही क्रेडिट कार्डचा चुकीचा वापर केला तर त्याचे नुकसान तुम्हाला सोसावे लागेल आणि तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकाल. एकदा कर्जाच्या जाळ्यात फसल्यास हे आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरू शकते. आम्ही येथे काही अशा चूका सांगणार आहोत, ज्यापासून सर्व क्रेडिटकार्ड धारकांनी सावध राहिले पाहिजे.
1. रोख रक्कमेच्या विड्रॉलला व्याजमुक्त कालावधी समजू नये
व्यापारी संस्था किंवा ऑनलाइनच्या पॉइंट-ऑफ-सेलवर क्रेडिट कार्डवर केलेल्या खरेदीला 51 दिवसांपर्यंत व्याजमुक्त कालावधी मिळतो. परंतु, हे एटीएममधून कॅश काढल्यानंतर मान्य नाही. ज्या दिवशी तुम्ही एटीएममधून पैसे काढाल त्या दिवसापासून व्याज लागू होते.
2. बाकी रक्कमेला पुढील बिलापर्यंत खेचून नेऊ नका
क्रेडिट कार्डच्या बाकी रक्कमेचा पूर्ण भरणा ठरलेल्या तारखेपर्यंत न करण्याचा अर्थ आहे की, तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलाला पुढे येणार्या बिलात जोडून घ्याल. असे केल्याने, तुम्हाला उच्च व्याजदर द्यावा लागेल. सामान्यपणे शुल्क प्रति महिना सुमारे 3.5 टक्के आणि वार्षिक आधारावर 36 टक्के आणि 42 टक्केच्या दरम्यान असते.
जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या बाकी रक्कमेसाठी आंशिक भरणा करत असाल आणि शिल्लक रक्कम पुढे घेऊन जायची असेल तर शिल्लक रक्कमेचा भरणा करण्यासाठी पुढील ठरलेल्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर करा. यामुळे व्याज शुल्क कमी ठेवण्यास मदत मिळेल.
3. ठरलेली तारीख चूकवणे
तुम्हाला क्रेडिट कार्डची देय तारीख लक्षात ठेवली पाहिजे. जर देय रक्कमेची अंतिम तारीख चूकली, तर क्रेडिट कार्डवर दंड लावला जातो, जो रक्कमेच्या आधारावर 900 रुपयांपर्यंत असू शकतो. कार्ड जारीकर्ता आणि देय रक्कमेनुसार दंड वेगवेगळा असतो. प्रत्येक क्रेडिट कार्डमध्ये कोणत्याही बिलाच्या रक्कमेच्या कमीतकमी 5 टक्के देय रक्कम भरावी लागते. यासाठी आपल्या बँकेचे निर्देश किंवा ऑटो-डेबिटची निवड करणे चांगले ठरू शकते.
4. नव्या खरेदीवर कोणताही व्याजमुक्त कालावधी नाही
वेळेत संपर्ण बिलाची देय रक्कम न भरल्यास उच्च व्याज खर्च समाप्त होईल, तसेच वापरकर्त्याला नव्या खरेदीवर व्याजमुक्कत दिवससुद्धा मिळणार नाहीत. सामान्यपणे सर्व क्रेडिट कार्ड ठरलेल्या तारखेच्या अगोदर कार्डावर 45-51 दिवसांचा मोफत क्रेडिट कालावधी देतात, परंतु मागील चक्राची पूर्ण बिलाची देय रक्कम न भरल्यास, हा लाभ मिळत नाही.