बहुजननामा ऑनलाईन टीम : मोबाईल दूरसंचार कंपन्यांनी रोजच्या डेटा प्लॅनमध्ये अनेक सुविधा दिल्या आहेत, तरी अनेकदा आपल्याकडून तो डेटा नकळत खर्च होत असतो. इंटरनेटचा कमी वापर करूनदेखील इंटरनेट पॅक लवकर संपतो. परंतु, मोबाईलमध्ये इंटरनेट वापरताना काळजी घेऊन डेटाचा खर्च कमी केला, तर आपले पैसे वाचविता येतील. त्यासाठी अनेक ॲप आणि विविध पर्याय उपलब्ध आहेत. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ या !
१ ) ‘ट्रॅंगल ॲप’ :
गुगलच्या ‘ट्रॅंगल’ या नवीन ॲपमध्ये मोबाईल डेटाची बचत करण्याचे संपूर्ण सोल्युशन असेल. सध्या या ॲपची फिलिपीन्समध्ये चाचणी सुरू आहे. तसेच या ॲपचे अजून एक फिचर म्हणजे आपल्याला माहीत नसताना ‘घुसखोरी’ करणारी अनेक ॲपदेखील ब्लॉक करण्याची सोय या ॲपमध्ये आहे. ट्रॅंगल ॲपमध्ये मोबाईलचा डेटा बॅलन्स आणि वापरलेला डेटा अशी माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसते, तसेच यामध्ये काही ॲप केवळ १० ते १५ मिनिटेच सुरू ठेवण्याची परवानगी आपण देऊ शकतो. सध्यातरी हे ॲप गुगल प्लेवर उपलब्ध आहे. मात्र ते केवळ ठराविक भागासाठी कार्यरत असल्याने डाउनलोड करता येणार नाही.
२) ऑटो अपडेटिंग ॲप :
बहुतेक स्मार्टफोन वापरकर्ते प्ले स्टोअरमध्ये ‘सेट टू ऑटो अपडेट्स ॲप्स’ असा पर्याय निवडतात. ज्यामुळे मोबाईलमधील ॲपचे अपडेटेड व्हर्जन बाजारात दाखल झाल्यावर लगेच त्यांचे ॲप अपडेट होते. या अपडेशनमुळे मोबाईलचा सर्वाधिक डेटा खर्च होतो. हा डेटा खर्च वाचविण्याकरिता प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऑटो अपडेट ॲपऐवजी ‘डू नॉट ऑटो अपडेट ॲप’ किंवा ‘ओन्ली ओव्हर वाय-फाय’ हा पर्याय निवडावा. त्यामुळे ॲप आपोआप अपडेट होणार नाही. काही ठराविक ॲपच्याबाबतीत ही सुविधा हवी असेल, तर तुम्ही प्रत्येक ॲपच्या सेटिंगमध्ये ‘डू नॉट ऑटो अपडेट ॲप’ पर्याय निवडावा.
३) रिस्ट्रिक्ट बॅकग्राउंड डेटा :
अनेकदा ऑनलाईन पद्धतीने काहीही न करतादेखील इंटरनेट खर्च करतो. हे थांबविण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन डेटा युजेसचा पर्याय निवडल्यावर तुम्हाला कोणते ॲप किती डेटा वापरते, याची माहिती मिळेल. त्यानंतर प्रत्येक ॲप सुरू केल्यावर तेथे खालच्या बाजूस असलेला ‘रिस्ट्रिक्ट बॅकग्राउंड डेटा’ असा पर्याय निवडावा. ज्यामुळे ॲप बंद असताना होणारा डेटा खर्च होणार नाही.
Visit : bahujannama.com