इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानने कलम ३७० रद्द केल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरसंदर्भातील मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित केला, या कारणामुळे पाकिस्तान स्वत:चेच कौतुक करत आहे, तसे असले तरी पाकिस्तानच्या या मूर्खपणाच्या कोणताही देश त्याची साथ देण्यास तयार नाही, त्यात आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणावर सौदी अरेबियाने आपली नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती पाकमधीलच एका साप्ताहिकाने प्रकाशित केली आहे.
इम्रान हे संयुक्त राष्ट्रांचा दौरा आटोपून न्यूयॉर्कमधून पाकिस्तानला परतत असताना विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते कॅनडातून परत न्यूयॉर्कला नेण्यात आले, अशा बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यात कोणतंही तथ्य नसून विशेष अतिथी या नात्याने इम्रान यांच्यासाठी पाठवण्यात आलेले हे विमान सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनीच माघारी नेण्याचे आदेश दिले होते. इम्रान यांनी केलेल्या भाषणावर सलमान नाराज होते, त्यामुळेच त्यांनीच हे विमान माघारी आणण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्यानंतर इम्रान यांना त्या विमानातून उतरून दुसऱ्या विमानाने प्रवास करावा लागल्याची माहिती मिळाली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी इम्रान न्यूयॉर्कला जाणार होते, त्याआधी इम्रान खान सौदी अरेबियात गेले होते. तिथून ते कमर्शियल विमानानेच न्यूयॉर्कला जाणार होते. मात्र, सौदीच्या युवराजांनी इम्रान यांना अतिथी म्हणून आपलं विशेष विमान प्रवासासाठी उपलब्ध करून दिलं. या विमानाने इम्रान अमेरिकेत गेले. तिथे संयुक्त राष्ट्रांची आमसभा उरकून पुन्हा त्याच विमानाने ते पाकिस्तानाकडे परतत होते. मात्र, सौदीच्या युवराजने अर्ध्यावरूनच हे विमान माघारी नेण्यास सांगितले. त्यामुळे इम्रान यांचा खोळंबा झाला आणि त्यांना न्यूयॉर्कमधून दुसऱ्या विमानाने पाकिस्तानला जावे लागले.
दरम्यान एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, इम्रान यांनी संयुक्त राष्ट्रसंघात केलेल्या भाषणावर युवराज नाराज असल्याने त्यांनी विमान परत बोलावून घेतले आहे, तसेच इराणशी पाकिस्तानची वाढती मैत्रीही सौदीला खुपत असल्याचेही कारणही या विमान परत बोलवण्यामागे असावे अशी शक्यता वर्तविली जात आहे. परंतु हे आरोप पाकिस्तान सरकारने फेटाळून लावले आहे. ते म्हणाले कि, इम्रान यांचं विमान माघारी नेण्याबाबतचे वृत्तात कोणतेही तथ्य नाही. पाक आणि सौदी शासनांमध्ये चांगले संबंध आहेत आणि राहतील.
Visit : bahujannama.com