मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांची पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या होत्या. काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. पण कोल्हापूरचे पालकमंत्री पद नको असल्याचे त्यांनी सांगितल्याने काँग्रेसचे सतेज पाटील यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. सतेज पाटील यांच्याकडे अगोदर विदर्भातील भंडारा जिल्हा दिला गेला होता. पण तेथील पालकमंत्री पद आता विश्वजित कदम यांच्याकडे देण्यात आले असून नव्या सरकारचे हे नाराजीनाट्य अजूनही संपलेले नाही. त्यामुळेच त्यांना अजूनही बदल करावे लागत आहेत.
नवीन पालकमंत्री पदाची नवी यादी पुढीलप्रमाणे-
1 मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
2 रायगड – आदिती सुनिल तटकरे
3 पुणे- अजित अनंतराव पवार
4 नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
5 जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
6 जालना- राजेश अंकुशराव टोपे
7 उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
8 अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
9 सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
10 नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
11 परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
12 हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
13 नागपूर- नितीन काशिनाथ राऊत
14 गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे
15 भंडारा- विश्वजित पतंगराव कदम
16 पालघर- दादाजी दगडू भुसे
17 कोल्हापूर- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
18 अमरावती- यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
19 गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
20 मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
21 सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
22 नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
23 रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब
24 ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
25 सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
26 चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार
27 धुळे- अब्दुल नबी सत्तार
28 औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
29 यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
30 वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
31 सांगली- जयंत राजाराम पाटील
32 बीड- धनंजय पंडितराव मुंडे
33 लातूर- अमित विलासराव देशमुख
34 अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
35 बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे
36 वर्धा- सुनिल छत्रपाल केदार