सातारा : बहुजननामा ऑनलाईन – पुणे बँगलोर हायवेवर सातारा तालुक्याच्या हद्दीत ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. साताऱ्यातील डी मार्टजवळ हा अपघात झाला. समोर चाललेल्या ट्रकला ट्रॅव्हलने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेनंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात असेलल्या ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. अपघातग्रस्त प्रवासी हे कर्नाटकातील आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरुवारी (12 सप्टेंबर) पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. केए01 एएफ9506 या एसआरएस कंपनीच्या ट्रॅव्हलने पुढे चाललेल्या एमएच 43 बीपी 3127 ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रव्हलची पुढची बाजू चक्काचूर झाली आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/ANI/
सातारा पोलीस ठण्यातील पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या महामार्गावरील वाहतूक सर्व्हीस रोडवर वळवली. यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
- वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप
- अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी