सातारा : बहुजननामा ऑनलाइन– Satara Crime | साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ असलेल्या नटराज मंदिराबाहेर आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास एका अनोळखी युवकाच्या डोक्यात गोळी झाडून खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना (Satara Crime) घडली आहे. भरदिवसा असा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा खून कोणत्या कारणातून झाला आहे याबाबत माहिती समोर आली नसून परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अधिक माहितीनुसार, साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकालगत नटराज मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दुपारी 25 ते 30 वर्षांच्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून अज्ञाताने खून केला असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. याठिकाणी बघ्यांचीही गर्दी झाली आहे. भरदिवसा खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Satara Crime )
दरम्यान, पोलिसांनी संबंधित युवकाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे.
तर दुसरीकडे संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून तातडीने हाती घेण्यात आलेय.
नटराज मंदिर परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहेत. जोपर्यंत खून झालेल्या तरुणाची ओळख पटत नाही.
तोपर्यंत हा खून कोणी केला व त्याचे कारण समोर येणार नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी सातारा शहर पोलीस (Satara City Police) अज्ञांताचा शोध घेत आहेत.
Web Title :- Satara Crime | one shot dead in bombay restaurant chowk in satara crime news
हे देखील वाचा :
सम्राट अशोकचा हा खजिना शोधण्यासाठी Ratan Tata यांनी केली होती मदत, अनेक वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट!