Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा मृत्यू
सातारा : बहुजननामा ऑनलाइन – Satara Crime | सातारा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना (Satara Crime) समोर आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकीची (Electric Bike) बॅटरी चार्ज करताना शॉक लागून एका युवतीचा मृत्यू (Died) झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना कराडमधील म्होप्रे गावात (Karad, Mhopre) रविवारी घडली आहे. शिवानी पाटील (Shivani Patil) असं त्या मृत युवतीचे नाव आहे. या घटनेमुळे कुंटूबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, शिवानी पाटील ही इलेक्ट्रिक दुचाकीचा वापर करत होती. रविवारी बाहेरगावी जाणार असल्यामुळे शिवानीने दुचाकीच्या बॅटरीचे चार्जिंग चेक केले. चार्जिंग कमी असल्याचे समजल्यानंतर शिवानीने दुचाकीची बॅटरी काढली आणि ती चार्ज करण्यासाठी घरामध्ये गेली. परंतुस बॅटरी चार्ज करण्यासाठी लावताना शिवानीला शाॅक लागला. त्यानंतर ती जखमी (Injured) झाली. शिवानीला कुटुंबियांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू (Died) झाला. या घटनेमुळे कुटुंबाने मोठा आक्रोश केला आहे. (Satara Crime)
Web Title : Satara Crime | girl died in satara due to shock while charging battery of electric bike
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क
Comments are closed.