Satara Crime | मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने 22 वर्षीय महिलेवर बलात्कार

Satara Crime | 22-year old woman from mumbai has been raped on the pretext of giving her child ayurvedic medicine in wai of satara district.
December 23, 2021

सातारा / वाई : बहुजननामा ऑनलाइन – Satara Crime | सातारा जिल्ह्यातील वाई (Wai News) येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे (Satara Crime) समोर आले आहे. मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध (ayurvedic medicine) देण्याच्या बहाण्याने मुंबई (Mumbai) येथील पती आणि सासूचा विश्वास संपादन करून 22 वर्षीय महिलेवर वाईत बलात्कार (Rape in Satara) केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विठ्ठल गणपत पवार (Vitthal Ganpat Pawar) नामकावर वाई पोलिस ठाण्यात (Wai Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, मुंबई येथील एका 22 वर्षीय महिलेच्या पतीची आणि सासूची विठ्ठल पवार या व्यक्तीची ओळख होती. त्या व्यक्तीने तिच्या सासर्‍याच्या गावी मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध मिळते असा बहाणा केला. त्यानंतर त्या महिलेला वाईत आणले. वाई शहरातील एका अपार्टमेंटमध्ये आणून एका खोलीत कोंडून ठेवले. आणि मारहाण करत महिलेवर बलात्कार केला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

दरम्यान, यानंतर विठ्ठल पवार याने चुलत्याच्या गावी यवतमाळ येथे या महिलेला नेले.
तेथेही मारहाण करुन महिलेवर बलात्‍कार केला. याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर पिडित महिलेने विठ्ठल पवार याच्याविरोधात कुर्ला पोलिस ठाण्यात (Kurla Police Station) फिर्याद दिली आहे.

यानूसार ही तक्रार वाई पोलीस ठाण्यात वर्ग झाल्‍यानंतर संशयित आराेपीवर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास वाई पोलिस करीत आहेत.

 

Web Title :- Satara Crime | 22-year old woman from mumbai has been raped on the pretext of giving her child ayurvedic medicine in wai of satara district.

 

31st December | 7 दिवसात उरकून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे, अन्यथा नवीन वर्षात होईल अडचण; जाणून घ्या

Pune Crime | 50 लाखाचे खंडणी प्रकरण ! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुधीर रामचंद्र आल्हाटला अटक; माहिती अधिकार कार्यकर्त्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्याविरुद्ध FIR

कामाची बातमी ! जाणून घ्या Aadhaar-Voter ID लिंक करण्याच्या 3 सर्वात सोप्या पद्धती, SMS ने सुद्धा होईल काम

Pune Corporation | पुणे महापालिकेला ‘घबाड’ सापडलं ! मनपाला मिळणार 10 हजार 60 कोटी रुपयांचा महसुल; तब्बल 7,440 Km च्या बेकायदा केबल्स आढळल्या, रिलायन्सच्या ‘जिओ डिजिटल फायबर प्रा.लि.’ चे प्रमाण सर्वाधीक