Sassoon Hospital | ससूनच्या डॉक्टरांची खाजगी मेडिकल वाल्यांशी ‘दुकानदारी’; ससून रुग्णालयाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, कारवाई होणार? (Video)

June 12, 2024

पुणे : Sassoon Hospital | पुण्यातील सरकारी रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयातील कारभार आता दिवसागणिक चव्हाट्यावर येऊ लागला आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणांमध्ये (Lalit Patil Drug Mafia) या रुग्णालयाचे लक्तरे वेशीवर टांगले गेल्यानंतर अग्रवाल पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident Pune) प्रकरणातसुद्धा या डॉक्टरांनी कारनामा केल्याचे समोर आलं आहे.

ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) यांनी बिल्डर विशाल अग्रवालच्या (Vishal Agarwal Builder) अल्पवयीनमुलाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलाचा (Blood Sample Tampering Case) धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मागेच उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला.

आता ससूनच्या डॉक्टरांनी खाजगी मेडिकल वाल्यांशी दुकानदारी थाटल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत झालेली असताना रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी मेडिकलमधून औषधे, शस्त्रक्रियेचे साहित्य खरेदी करण्यास सांगत न्युरोसर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरने तब्बल २४ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. इतकेच नव्हे तर पैसे न दिल्यास पेशंट दगावण्याची भीती घालतानाच नातेवाइकांना पोलिस केसमध्ये अडकवण्याची धमकीही या डॉक्टरने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील सय्यदनगर भागात एक विधवा महिला असून, तिच्या १७ वर्षीय मुलावर ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मेंदूची शस्त्रक्रिया झाली. त्याचा डिस्चार्ज करतेवेळी मात्र न्युरोसर्जरी विभागातील निवासी डॉ. किरण याने त्यांना २४ हजार ५०० रुपयांचे किट मेडिकल तेजपाल मेडिकलमधून आणण्यास सांगितले.

तसेच तेजपाल मेडिकलमध्ये ते पैसे भरण्यास सांगितले. यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी कोंढव्यातील जुबेर मेमन या सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्या लोकांनी हे स्टिंग ऑपरेशन करून हा प्रकार उघडकीस आणला. या स्टिंगमध्ये संबंधित डॉक्टर हा रुग्णाच्या नातेवाइकांना पैसे मागताना दिसत आहे. आता ससूनमधून नव्याने समोर आलेल्या या प्रकाराला पाठीशी घातलं जाणार की कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.