नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UPSC CMS Exam 2020 Notification : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2020 चे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. विहित अर्हता असलेले इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. त्याअंतर्गत 559 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंतच्या आतील उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. जाहीर झालेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी www.upsc.gov.in या लिंक वर क्लिक करा आणि सूचनेशी संबंधित सविस्तर माहिती जाणून घ्या. उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. वरील पदांच्या नियुक्तीसाठी 22 ऑक्टोबर 2020 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.
पदांचे विवरण आणि संख्या :
– केंद्रीय आरोग्य सेवेमध्ये ज्युनिअर स्केल पोस्ट- 182
– रेल्वे विभागात असिस्टंट डिव्हिजन मेडिकल ऑफिसरची पदे – 300
– भारतीय आयुध फॅक्टरी आरोग्य सेवेत असिस्टंट मेडिकल ऑफिसरची पदे- 66
– नवी दिल्ली नगरपालिका परिषदेत जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसरची पदे – 04
– पूर्व दिल्ली महानगरपालिका, उत्तर दिल्ली महानगरपालिका आणि दक्षिण दिल्ली महानगरपालिकेमध्ये जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर ग्रेड-II ची पदे- 07
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांना एमबीबीएस अंतिम परीक्षेचे लेखी आणि प्रॅक्टिकल पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे जास्तीत जास्त वय 32 वर्षे असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेची गणना 01 ऑगस्ट 2020 च्या आधारे केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा :
– ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख : 29 जुलै 2020
– ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2020 (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत)
– अर्जाचे शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2020
– लेखी परीक्षेची तारीख : 22 ऑक्टोबर 2020
अर्जाचे शुल्क :
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण/ ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 200 रुपये जमा करावे लागतील. एससी/ एसटी/ पीएच वर्गासाठी अर्ज विनामूल्य आहे. शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा एसबीआयच्या कोणत्याही शाखेतून चलनाद्वारे भरावे लागेल.
अर्ज प्रक्रिया
जाहीर झालेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी अर्जाची एक प्रिंटआउट आपल्याजवळ ठेवा.
निवड प्रक्रिया : अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल.