बहुजननामा ऑनलाइन टीम : पश्चिम मध्य रेल्वेने ट्रेड अॅप्रेंटिस अंतर्गत इलेक्ट्रीशियन, फिटर, वायरमनसह 570 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे दहावी उत्तीर्ण उमेदवारही या पदांवर सरकारी नोकरी करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त संस्थेकडून 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित केले गेले आहे. 100 रुपये निश्चित अर्ज शुल्क आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे 15 फेब्रुवारी 2020 ते 15 मार्च 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. संबंधित नोकरीशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण येथे क्लिक करुन सूचना तपासू शकता.
पूर्व रेल्वे भरती २०२० : रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) वेगवेगळ्या विभागातील अनेक पदे रिक्त केली आहेत. पूर्व रेल्वे क्षेत्र कोलकातामध्ये, ट्रेड अॅप्रेंटीस अंतर्गत 2792 पदांसाठी भरती घेण्यात आली आहे. रेल्वे भरती मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 फेब्रुवारी 2020 पासून ते 1 मार्च 2020 पर्यंत सुरू राहिल. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे म्हणले तर 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांवर अर्ज करू शकतात. अर्जासाठी उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित केले गेले आहे. पूर्व रेल्वे विभाग कोलकातामध्ये पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल तर महिला व अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारांना फी भरावी लागणार नाही.