बहुजननामा ऑनलाईन – छोट्या पडद्यावर बा म्हणून ओळखल्या जाणा-या प्रसिध्द अभिनेत्री तरला जोशी (Tarla Joshi) यांचे रविवारी (दि. 6) निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्री निया शर्मा हिने तरला जोशी (Tarla Joshi) यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
निया शर्माने तरला जोशींचे फोटो शेअर करत लिहिले की, RIP बडी बीजी तुमची आठवण येईल.
तरला जी तुम्ही नेहमी बडी बीजी राहाल असे म्हटले आहे.
तरला जोशी यांनी बंदिनी, साराभाई व्हर्सेस साराभाई आणि एक हजार में मेरी बहना है आदी सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
बंदिनी या मालिकेतून तरला यांना खरी ओळख मिळाली होती.
तर एक हजार में मेरी बेहना है या मालिकेत त्यांनी अभिनेत्री निया शर्मा आणि क्रिस्टल डिसूझासोबत काम केले होते.
कृपया हे देखील वाचा:
IPL चे उर्वरित सामने ‘या’ दिवसापासून सुरु होणार; फायनल दसऱ्याला ?, जाणून घ्या
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ऑक्सिजन सपोर्टवर
काय सांगता ! होय, भुकेलेल्या सापाने गिळली सव्वा किलोची कोंबडी
हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप, म्हणाले- मोदी सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले