या चित्रपटाच्या एका मुलाखतीमध्ये साराला (Sara Ali Khan) करिना कपूरबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये तिला विचारलं होतं की, तूला करिना कपूर (Kareena Kapoor) कडून कोणती गोष्ट शिकायची आहे? याचं उत्तर देताना सारा म्हणाली की, “सगळ्यात जास्त चांगली गोष्ट जी मला त्यांच्यामध्ये दिसते, ती आहे प्रोफेशनलिझम..! करीना कपूर दोन मुलांची आई आहे. तरीदेखील ती चित्रपट करते. ब्रांड शूट करते. करीना माझ्यासाठी एक उदाहरण आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कामाला सगळ्यात प्रथम महत्त्व देऊ इच्छिते, अशी आशा व्यक्त करते.”
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, सारा अली खान लवकरच ‘अतरंगी रे मध्ये दिसणार असून, हा चित्रपट 24 डिसेंबरला ‘डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar)’वर प्रदर्शित होणार आहे. तर ‘अतरंगी रे’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चाहत्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात.