बहुजननामा ऑनलाईन – हरियाणा राज्याची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. सपनाच्या या नवीन गाण्याचे नाव ’पायल चांदी की’ असं आहे. प्रत्येक गाण्याप्रमाणेच हे गाणेही तिच्या चाहत्यांना खूप आवडेल. तसेच हे गाणं सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तिच्या नृत्याने सर्वांचे मन जिंकणारी हरियाणाची प्रसिद्ध नर्तक सपना चौधरी हिचे नुकतेच नवं गाणं प्रदर्शित झालंय. सपनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही हे गाणं शेअर केले आहे. प्रत्येक गाण्याप्रमाणे सपनाच्या या गाण्यालाही तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. हे गाणेही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यापूर्वी 8 मार्च रोजी सपना चौधरी यांचे ’गुंडी’ हे गाणेही रिलीज झाले होते. तिच्या गाण्यानेही बरीच प्रसारमाध्यमांच्या चर्चेत राहिली. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हे गाणं सपनाने प्रसिद्ध केलं आहे.
‘पायल चांदी की’ या नवीन गाण्याबद्दल बोलायचं झालं तर, या गाण्यात सपना पारंपारिक लूकमध्ये दिसली आहे. हरियाणवी ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हरियाणाच्या प्रसिद्ध गायिका रेणुका पवार यांनी या गाण्यासाठी आपला आवाज दिला आहे. हे गाणे मुकेश यांनी लिहिले असून संगीत रांझा यांचे आहे.
सपना चौधरी ही आज फेमस आहे. तिने हरियाणवी संगीत क्षेत्रात तसेच टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसमध्येही काम केले आहे. बिग बॉसमध्ये ती चांगलीच गाजली होती. या ‘शो’नंतर ती प्रत्येक या घरात प्रसिद्ध झाली होती.