मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – हरियाणवी डान्सर सपना चौधरीचा एक डान्स व्हिडीओ यूट्यूबवर खूप व्हायरल होतो आहे. हे गाणे अधिक पाहिले जात आहे कारण कित्येक दिवसानंतर सपनाची जुनी स्टाईल बघायला मिळते आहे. या व्हिडिओमध्ये सपना ‘चटक मटक’ गाण्यावर डान्स करतांना दिसते आहे. निळ्या सूटमध्ये सपना खूप सुंदर दिसते आहे. तिने ज्या एनर्जीने डान्स करण्यास सुरवात केली आहे ते आश्चर्यकारक आहे.
हा व्हिडीओ २२ मे २०१८ ला यूट्यूबवर अपलोड केला गेला आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत २० लाख पक्ष जास्त लोकांनी बघितला आहे. या व्हिडीओला सपनाच्या चाहत्यांनी कमेंटचा भडीमार केला आहे. प्रत्येकजण सपनाच्या एनर्जेटिक परफॉर्मेंसचे कौतुक करत आहे. तसे, चाहत्यांची प्रशंसा सपनासाठी नवीन नाही. सपना आपल्या प्रत्येक व्हिडीओमुळे सपना चौधरी सोशल मीडियावर अशा प्रकारे व्हायरल होत असते त्यामुळे तिची जादू आपल्या चाहत्यांवर पडल्याशिवाय राहत नाही.
https://youtu.be/uC-PeMdCSj8
आता सपना चौधरीचे फॅन फॉलोव्हिंग आणि काममध्ये बरेच बदलाव झाले आहे. हे सर्व बदल ती बिग बॉस मध्ये आल्यामुळे झाले आहेत. सपना चौधरीला बिग बॉस मुळे एक नवीन स्टारडम भेटला आहे. लोकांना पडद्यावर दिसणाऱ्या सपनाचा एक नवीन पैलू पहायला मिळाला आहे. इथून पुढे सपनाने करिअर चे नवीन दरवाजे उघडले गेले आहेत. तिला केवळ बॉलिवूडच नाही तर पंजाबी,भोजपुरी इंडस्ट्रीमधून सुद्धा ऑफर मिळत आहेत. आता सपना चौधरीचे चाहते केवळ हरियाणा पुरते मर्यादित राहिले नाहीत तर देशभरात तिचे भरपूर चाहते झाले आहेत.