बहुजननामा ऑनलाइन टीम – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Sanjay Raut’s wife)या आज ईडीच्या कार्यालयात जाणार नाही, असे समजते. त्यांनी ५ जानेवारीपर्यंत मुदत मागितली असल्याचे सांगण्यात येत आहे.
खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या गेल्या दीड महिन्यांपासून ईडीकडून पत्रव्यवहार सुरु आहे. त्यांनी काही माहिती मागितली होती. त्यांना ती माहिती आम्ही दिली आहे. परंतु, या पत्रव्यवहारात कोणत्याही चौकशीचा उल्लेख केलेला नाही. जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआय यासारखी हत्यारे वापरावी लागतात. आम्ही ईडीच्या नोटीसीला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणीही चुकीचे काही केलेले नाही, असे संजय राऊत यांनी काल ईडीच्या नोटीसीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र, आज त्यांनी वेगळी भूमिका घेतली असल्याचे समजते.
आपल्याला चौकशीसाठी येण्यास ५ जानेवारीपर्यंत मुदत द्यावी, अशी विनंती ईडीला पत्र पाठवून करण्यात आली आहे.