मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भोपाळमध्ये आयोजित केलेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात एका पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. शिबिरात वाटल्या गेलेल्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्याबाबत वादग्रस्त लिखाण केले गेले आहे. त्यावर शिवसेनेचे संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरातील पुस्तकाचा समाचार घेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या मनात कचरा असल्याचे मत व्यक्त केले आहे.
Sanjay Raut,Shiv Sena on a statement in Congress Seva Dal booklet ‘Godse&Savarkar had a physical relationship’: Veer Savarkar was a great man and will remain a great man. A section keeps talking against him,it shows the dirt in their mind,whoever they might be pic.twitter.com/Yv3aLJjraC
— ANI (@ANI) January 3, 2020
‘स्वातंत्र्यवीर सावरकर महान होते आणि कायमी महानच राहतील. जे लोकं त्यांच्या विरोधात बोलतात त्यांच्या मनात कचरा आहे. मग ते कोणीही असो’, असे संजय राऊत यांनी म्हटले आहेत. या शिबिरात ‘वीर सावरकर-कितने वीर’ नावाच्या पुस्तकाचे वाटप केले गेले होते. तसेच पुस्तकात सावरकरांशी संबंधित वेगवेगळे प्रश्न, घटना आणि वादांबद्दल माहिती दिली आहे.
Visit : bahujannama.com