• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदीचं नाव देऊ’ – नीलेश राणे

by Balavant Suryawanshi
February 25, 2021
in पुणे, राजकीय
0
nilesh-rane-sanjay-raut

nilesh-rane-sanjay-raut

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  अहमदाबादमधील मोटेरा हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. नुकतेच त्याचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. दरम्यान, या नामकरणावरून आता जोरदार राजकारण पेटले आहे. सरदार पटेलांचे नाव वगळून स्वत:चे नाव देण्याच्या निर्णयावरून नरेंद्र मोदींवर विरोधक सडकून टीका करत आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव देण्याच्या निर्णयाचा समाचार घेतला. त्यानंतर, भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना, हे असले पांचट विषय बंद करावेत, असे म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत, ते मोठेच नेते आहेत. पण, संजय राऊत खालच्या कुठल्या क्रमांकाचे नेते आहेत, हे मला माहीत नाही. संजय राऊतांनी स्टेडियमच्या नावावरुन टीका केली आहे. पण, आक्षेप कोणाचा आहे? स्टेडियलमा मोदींचं नाव न देण्यासाठी कोणाचा आक्षेप आहे का, असा सवाल राणेंनी विचारला. तसेच, सुब्रोतो रॉय यांच्या पुण्याच्या स्टेडियमच्या उद्घाटनाला शरद पवार गेले होते, त्यावेळी या स्टेडियमला सुब्रतो रॉय यांचे नाव होते. मग, सुब्रोतो राय शरद पवारांपेक्षा मोठे झाले का? असेही ते म्हणाले. संजय राऊत यांनी पांचट विषय बंद करावेत, देशासमोर खूप मोठे प्रश्न आहेत. जर, आक्षेपच नसेल तर पोटात का दुखतंय. आम्ही आमच्या घराला मोदींच नाव देऊ नाही तर स्टेडियमला. मूळात, संजय राठोड हे प्रकरण शिवसेनेसाठी अडचणीचं ठरत आहे. त्यामुळे, हे असले विषय काढून विषय वळविण्याचा हा प्रयत्न असल्याच टीका नीलेश राणे यांनी केली आहे.

राजीनामा घेण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये नाही – नीलेश राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, शिस्त पाळावी, गर्दी करू नये असं आवाहन केले होते, मात्र त्याचनंतर शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हजारोंच्या संख्येने शक्तीप्रदर्शन केले, यावरून भाजपा सचिव नीलेश राणेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नीलेश राणे म्हणाले की, ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतंय, सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतो, कॅबिनेट मिटिंगमध्ये बसतो, पण तरीही राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये नाही, परत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कधीही स्वत:च्या भाषणात मी मर्द आहे असं म्हणू नये असा टोला त्यांनी लगावला आहे.

मोदी सरदार पटेल पेक्षा मोठे – संजय राऊत

स्टेडियमला नाव दिल्याच्या निर्णयांबाबत एखादा राजकीय पक्ष किंवा सरकार फार काही बोलू शकत नाहीत. प्रत्येक राज्यात अनेक नेत्यांची नावे अशा प्रकारे दिली जातात. आता स्टेडियमला नाव देण्यास त्या राज्यातील सरकार आणि क्रिकेट संघटनेने मान्यता दिली आहे. मात्र मोदी आता मोठे नेते झाले आहेत. त्यामुळे मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

Tags: AhmedabadBJPnarendra modiNarendra Modi Stadiumnilesh ranepunePune NewsSanjay RathodSanjay Rautsharad pawarShiv SenaSubroto RoyUddhav Thackerayअहमदाबादउद्धव ठाकरेक्रिकेट स्टेडियमनरेंद्र मोदीनरेंद्र मोदी स्टेडियमनीलेश राणेपुणेभाजपशरद पवारशिवसेनासंजय राऊतसंजय राठोडसुब्रोतो रॉय
Previous Post

Pooja Chavan Suicide Case : ‘साहेब, असल्या गलिच्छ गोष्टीचं कधीही समर्थन करणार नाहीत’; चित्रा वाघ म्हणाल्या – ‘मी शरद पवारांना भेटणार’

Next Post

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

Next Post
vaccine

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

nilesh-rane-sanjay-raut
पुणे

‘संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदीचं नाव देऊ’ – नीलेश राणे

February 25, 2021
0

...

Read more

बांधकाम साईटवरील सुपरवायझरकडून एकाला बेदम मारहाण

1 day ago

अजय देवगनची लेक थिरकली ‘बोले चुडिया’ गाण्यावर; नास्याचे ठुमके पाहून चाहते पडले प्रेमात

4 days ago

सर्वपक्षीय बैठक सुरूच ! मुख्यमंत्री ठाकरे यांचं मोठं विधान, म्हणाले – ‘लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही’

6 days ago

Pune : रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी पुण्यात कोरोना रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर; भल्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, प्रशासनाची तारांबळ

2 days ago

Nana Patole : ‘Lokdown चा निर्णय घेतला तर तो मोदी सरकारच्या नियोजनशून्य लॉकडाऊनसारखा नको’

6 days ago

नाना पटोलेंचा दावा, म्हणाले – ‘पुढील वेळी इंदापूरमध्ये काँग्रेसचा आमदार, अजित पवारांचं टेन्शन वाढलं’

6 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat