मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Sanjay Raut | राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवडक भाषणाचे ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (शनिवारी) मुंबईत झाले. त्या कार्यक्रमाला शिवसेना नेते (Shiv Sena) आणि खासदार संजय राऊतही (Sanjay Raut) उपस्थित होते. नुकतेच राऊत यांनी संसदेत शरद पवार यांना खुर्ची देतानाचा फोटो व्हायरल झाला. यावरुन विरोधकांनी राऊतांवर टीका देखील केली. यावरुन आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधकांवर पलटवार केला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘मी शरद पवार यांना खुर्ची का दिली, हे समजायला त्यांची 61 भाषणं वाचली पाहिजेत. मी निमंत्रणाशिवाय जावं, अशी मोजकीच कुटुंब महाराष्ट्रात आहेत. पवार कुटुंब त्यापैकीच एक आहे. सुधीर भोंगळे यांनी काल मला हे पुस्तक दिलं. त्यानंतर फोन करुन मी तुम्हाला निमंत्रण द्यायला विसरल्याचे त्यांनी म्हटले. पण मला या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याची गरजच नव्हती. आम्हाला आदेश घेण्याची सवय आहे. आम्ही कितीही शिखरावर गेलो की, एकदा घरच्यांनी आदेश दिला की आम्ही तो न कुरकुरता पाळतो.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढे राऊत म्हणाले, ‘शरद पवार यांनी आजपर्यंत राज्याला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं. त्यामुळे तरुणांनी त्यांचं हे भाषणांचं पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. यामधून अनेकांना दिशा मिळेल. महाराष्ट्रातील विरोधकांचा सन्मान करण्याच्या परंपरेविषयी सांगताना राऊत यांनी पवारांचा एक किस्साही सांगितला. शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर नागपूरात केलेलं भाषणही या पुस्तकात आहे.
पण, मला पवार यांनी सावरकर यांच्यावर बारामतीत केलेलं एक भाषण आठवतं.
थोडेफार मतभेद असूनही महाराष्ट्रातून निर्माण झालेल्या वीर सुपूत्राचा सन्मान करणारे ते भाषण होते.आपल्या विरोधकांचा सन्मान करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याच परंपरेला हे साजेसं भाषण होतं.
Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut praises sharad pawar says i am always ready to obey orders of sharad pawar.
Google वर कसलाही शोध घेण्यासाठी उपयोगी पडतील ‘या’ 9 पद्धती, मिळेल ‘तात्काळ’ रिझल्ट