Sanjay Raut | ‘त्या’वेळी चंद्रकांत पाटील यांनाही तोंडाला फेस आला होता – संजय राऊत
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Sanjay Raut | राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजप आणि महाआघाडी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्यांसह थेट चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर आरोप केले. त्यानंतर कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेनं लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोप्पं आहे, पण ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल असा प्रत्यारोप चंद्रकात पाटील यांनी केला. त्यावरून शिवसेनेने (Shiv Sena) मुखपत्र (Sanjay Raut) असलेल्या सामनातून भाजप नेत्यांवर टीकेचे बाण सोडले आहे.
महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना असे वाटते की, ईडी, सीबीआयसरख्या (ED, CBI) केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या खिशातच आहेत व त्यांच्या जोरावर आपण राजकीय विरोधकांना धमक्या देऊ शकतो. तसे त्यांनी धमकीपत्र चालवले. काहीही झाले तरी केंद्रीय तपास यंत्रणेची धमकी देतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही हसन मुश्रीफ यांनाही ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल अशी केंद्रीय तपास यंत्रणेची धमकी दिली. ईडीचा इतका अनुभव पाटील यांना कधीपासून आला ? असा सवालही विचारण्यात आला आहे.
कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांचे वजन आहे. ते मंत्रीही आहेत. विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडासाफ केला गेला. चंद्रकांत पाटील यांना तर कोल्हापुरातून पळ काढून कोथरूडमधून निवडणूक लढवावी लागली. मात्र, येथे विजय मिळवताना पाटलांच्याही तोंडाला तसाच फेस आला होता. अशा शब्दात शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटलांनी ईडी सोबत लढताना तोंडाला फेस येईल असे सांगणे हा अंहकार आहे. आम्ही काहीही करू शकतो, आमची वर सत्ता अशी भाषा अनेकदा पाटील यांनी वापरली आहे. विरोधकांचे कोथळे केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे चालवून आम्ही काढू, बेजार करु ही त्यांची नियत आहे. हा अहंकार महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारा असल्याचे अग्रलेखात (Sanjay Raut) म्हटलं आहे. ईडीमुळे कोणाच्या तोंडाला फेस येतोय ते नंतर पाहू. केंद्रीय जोर लावूनही ठाकरे सरकार पडत नाही म्हणून विरोधी पक्षाच्या तोंडाला फेस आलेला दिसत असल्याचे शिवसेनेने म्हंटले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जनतेच्या जिवाशी खेळायचं आहे का?
अतिरेक्यांनी मुंबईतील लोकलमध्ये विषारी वायू सोडण्याचा कट रचला होता.
पोलीस त्या तपासात गुंतले असताना विरोधक भलतेच प्रश्न निर्माण करून पोलिसांवरील ताण वाढवत आहेत.विरोधकांनी निर्माण केलेल्या दुर्गंधीमुळेही जनजीवन विस्कळीत होऊ शकेल.
विरोधकांना राज्यातील जनतेच्या जिवाशी खेळायचे आहे का? असा सवालही विचारला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. त्यांचे बोलणे, वागणे कोणीही गांभीर्याने घेत नाहीत. त्यांच्या तोंडातून भाजपची लक्तरे लोम्बत असतात त्यांच्या वर्तनाने केंद्रीय तपास यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडेल. आणखी एक आरोप त्यांनी केला आहे तो म्हणजे सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचे स्किल नाही.
म्हणजे माजी मंत्री म्हणून त्यांच्या कडे ते आहे किंबहुना याबाबतची पीएचडी त्यांनी केली असावी. त्यामुळे ईडीने पाटील व इतर माजी मंत्र्यांच्या पैसे खाण्याचा हिशेब एकदा घ्यायला हवा आणि आधीच्या सरकारातील मंत्र्यांच्या तोंडाला फेस आणायला हवा.
असेही अग्रलेखात शिवसेनेने म्हंटले आहे.
Web Titel :- Sanjay Raut | shivsena mouthpiece saamana targets chandrakant patil over ed cbi action against mva government leaders.
Nitesh Rane | शिवसेना-राणे पुन्हा आमनेसामने; ‘त्या’ 2 प्रकल्पावरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर ‘प्रहार’
Comments are closed.