मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मागील काळात छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधाने केली होती. त्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि शिंदे गटाला धारेवर धरले आहे. शिवरायांचा अपमान होऊनही भाजप आणि स्वाभिमानाच्या गोष्टी करणारे शिंदे गटाचे आमदार आणि खासदार हात चोळत बसले आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या आराध्य दैवतांचा भाजपच्या आराध्य दैवतांकडून सतत अपमान होत आहे. त्यांना वाटत आहे, की हे राजकारण सुरू आहे. तसेच महाराष्ट्रावर कर्नाटककडून अन्याय होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष एकत्र आलेला आहे. आम्ही कोणत्याही क्षणी आमची पुढील भूमिका जाहीर करू. शिवाजी महाराजांचा एवढा अपमान होऊनही राज्यातील सरकार, मुख्यमंत्री, शिंदे मंत्रिमंडळ, आमदार, खासदार जे स्वाभिमानाच्या गप्पा मारून शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते आता हात चोळत बसले आहेत. ते किती वेळ हात चोळत आणि तोंड शिवून बसणार आहेत, आम्ही पण पाहतो. आणि राज्यातील जनता देखील पाहत आहे. यांनी शिवसेना फोडली कारण शिवसेनेला महाराष्ट्राचा अभिमान आहे. शिवाजी महाराजांवर प्रेम आहे. यांना तो अभिमान आणि प्रेम नाही. त्यामुळे या सर्वांवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही पावले उचलत आहोत, असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले. (Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt)
मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकरांच्या माफिनाम्याचा उल्लेख केला होता.
त्यावरून हे राजकारण पेटले होते. त्यावेळी भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी देखील औरंगजेब बादशहाची माफी मागितली होती,
असे म्हंटले होते. त्यावरून शिवसेना आणि इतर पक्ष आक्रमक झाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | sanjay raut criticizes bjp and shinde group over controversial statements made by governor koshyari and sudhanshu trivedi regarding chhatrapati shivaji maharaj
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | आरोपीचा पोलीस ठाण्यात राडा, पोलिसाच्या हाताचा घेतला चावा
Pune Pimpri Crime | दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, 2 पिस्टल, काडतुसे, कोयते जप्त